बनावट राशन कार्ड तयार करुन शासनाच्या योजनांचा लाभ घेणारी टोळी जेरबंद, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई
बनावट राशन कार्ड तयार करुन शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Mumbai Crime News : बनावट राशन कार्ड तयार करुन शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिंडोशी पोलिसांकडून 7 आरोपींना अटक केली आहे. जवळपास 350 बनावट राशन कार्ड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसापासून ही टोळी बनावट राशन कार्ड तयार करुन शासानाच्या विविध योजनांचा लाभ घेत होती. अखेर हे प्रकरण समोर आले आहे.
आरोपीकडून जवळपास 350 बनावट राशन कार्ड जप्त
मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी बनावट शिधापत्रिका तयार करून शासकीय योजनांची फसवणूक करणाऱ्या टोळी विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. बनावट राशन कार्ड तयार करणारे सात आरोपींच्या टोळीला दिंडोशी पोलिसांना अटक केली आहे. या आरोपीकडून जवळपास 350 बनावट राशन कार्ड त्याचसोबत लागणारे साहित्य दिंडोशी पोलिसांनी जप्त केली आहे. या आरोपीच्या टोळीमध्ये राशन कार्ड कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देखील सहभाग असून त्याला देखील दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून बनावट राशन कार्डचा वापर बांगलादेशी नागरिकांना त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली गैरप्रकार सुरू होता. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून गुन्हा क्र. 19/2026 दाखल आहे.आरोपींकडून बनावट 350 बनावट शिधापत्रिका, अन्य कागदपत्रे, 9 लॅपटॉप, 2 प्रिंटर आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. अटक मुख्य आरोपीचे नाव दयाल वय 29 वर्षे,राकेश सिंग वय 43 वर्षे,दिनेश कुमार केसारवाडी वय 40 वर्षे, एडवर्ड उर्फ सोनू डिसोजा वय 43 वर्षे, मनी संकर शर्मा वय 39 वर्षे, बिपिन कुमार पांडे वय 42 वर्षे, वीरू गुप्ता वीरू गुप्ता वय 31 वर्षे असून नेपाळ देशातील राहणारे नागरिक आहे. या आरोपीच्या टोळीमध्ये आणखी काही सदस्य आहेत का त्यासोबत या आरोपींनी मुंबई शहरात किती लोकांना बनावट राशन कार्ड विकला आहे यासंदर्भात दिंडोशी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसापासून ही टोळी बनावट राशन कार्ड तयार करुन शासानाच्या विविध योजनांचा लाभ घेत होती. अखेर हे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो KYC करताना सावधान, फेक वेबसाईटवर चुकूनही क्लिक करू नका!
























