Mumbai Crime News : मंबईतील गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर अनधिकृत भाजीवाल्यांच्या दोन टोळीमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारी मध्ये एका भाजी विक्रेताचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोरेगाव पश्चिम स्टेशन बाहेर बेस्ट डेपो च्या समोर भर दिवसा अनधिकृत भाजीवाल्यांच्या एका टोळी कडून एकाची हत्या केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हल्ला करणारे आई-वडील आणि मुलगा असा तिघांना अटक केली आहे.

Continues below advertisement

गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाल्यांचे साम्राज्य 

अटक केलेल्या आरोपीचे नाव मुकेश ब्रिजमोहन कोरी, ब्रिज मोहन देवताप्रसाद कोरी वय 52 वर्ष, सुशीला ब्रिजमोहन कोरे वय 48 वर्ष आहे. एक भाजीवाल्याचा टोळी कडून दुसरा भाजीवाल्याच्या टोळीला सातत्याने डिवचण्याचा जुना राग धरून हा वाद विवाद होऊन यात एका व्यक्तीचा हत्या करण्यात आली आहे. मात्र गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाल्यांचे साम्राज्य आहे. या अनाधिकृत फेरीवाल्यांचा विरोधात अनेक तक्रारी करून देखील मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जात नसल्याचे आरोप स्थानिकांनी केली आहे. 

हाणामारीची घटना घडल्यानंतर स्थानिककडून मुंबई महानगरपालिका विरोधात मोठी नाराजी

अनधिकृत फेरीवाल्यांकडून हाणामारीची घटना घडल्यानंतर स्थानिककडून मुंबई महानगरपालिका विरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून या अनधिकृत फेरीवालेवर कारवाई केली जात नसल्यामुळे एवढा दादागिरी वाढली असल्याची आरोप देखील केली जात आहे.

Continues below advertisement

मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाले आणि विक्रेते

 
मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाले आणि विक्रेते मोठ्या संख्येने बसलेले आढळतात, ज्यामुळं प्रवाशांना चालण्यासाठी अडथळा निर्माण होतो. या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि रेल्वे पोलीस (RPF) प्रयत्न करत असले तरी, अनेकदा कारवाईनंतरही हे विक्रेते पुन्हा परत येतात. हे अनधिकृत विक्रेते अनेकदा रेल्वे स्टेशनच्या जवळच्या जागांवर बसतात, ज्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास होतो. भारतीय रेल्वे आणि संबंधित महापालिका, जसे की नवी मुंबई महानगरपालिका (NMMC), या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करतात. मात्र, कारवाई केल्यानंतर देखील हे विक्रेते पुन्हा त्या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 
 
महत्वाच्या बातम्या: