तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर, संगीता गोळे या मुख्य आरोपी, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात (Tuljapur drugs case) संगीता गोळे (Sangeeta Gole) या मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर आलं आहे.

Tuljapur drugs case : तुळजापूर ड्रग्स प्रकरणात (Tuljapur drugs case) संगीता गोळे (Sangeeta Gole) या मुख्य आरोपी आहेत. संगीता गोळेचे पती वैभव गोळे आणि ड्रग्स प्रकरणातील आरोपी पिंटू मुळे यांची मुंबईत ओळख झाली होती. या ओळखीतून ड्रग्जची देवाणघेवाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंटू मुळे याच्या ड्रग्जमुळं मुंबईतील चकरा वाढल्या होत्या असेही पोलिस म्हणाले.
तुळजापुरात एक ग्राम ड्रग्जची किंमत अंदाजे 3000 असल्याची माहिती
पिंटू मुळेचा तुळजापुरात ड्रग्जबाबत पहिल्यांदा संबंध आला तो चंद्रकांत उर्फ बापू कने यांच्याशी. बापू कने यांच्या संपर्कातील इतर आरोपी ड्रग्ज प्रकरणात जोडले गेले होते. मुंबईतून पाच ग्रॅम वजनाच्या पुड्यांमध्ये ड्रग्ज तुळजापुरात येत होते. तुळजापुरात एका पुढीच्या अडीच ग्रॅम वजनाच्या दोन पुड्यांमध्ये त्याची विभागणी केली जायची, त्यानंतर ते वितरित केले जायचं. तुळजापुरात एक ग्राम ड्रग्जची किंमत अंदाजे 3000 असल्याची माहिती देण्यात आली आहे. तुळजापुरातून एका आरोपीच्या हॉटेलमधून हे ड्रग्ज वितरित केल जात असल्याची माहिती समोर आली आहे. तुळजापुरात वितरित केलं जात असलेलं ड्रग्ज क्रिस्टल फॉरमॅटमध्ये असल्याची माहिती आहे. अगोदर मौज म्हणून आरोपींनी ड्रग्ज घेतलं, त्यानंतर तुळजापुरात ड्रग्ज व्यापार सुरू झाला आहे. मुंबईतून तुळजापुरात येणारे ड्रग्ज सोलापूर मार्गे दाखल व्हायचं, पोलिसांनी सोलापुरातूनही आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पूजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीशी संबंध असल्याचे उघड
तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीची मोठी चर्चा आहे. या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या कारवाया होत आहेत. ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी राजकीय कनेक्शनही समोर आले होते. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पूजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तुळजापूर ड्रग प्रकरणात बहुतांश पुजारी पेडलर असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Tuljapur Drug Case) मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे. पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे. कारण यातील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते. आतापर्यंत या प्रकरणात 35 आरोपी निष्पन्न झाले असून, 21 आरोपी अजूनही फरार आहेत. यातील 13 आरोपी पुजारी असून मंदिरातील दररोजच्या पुज्याऱ्यांचा याच्याशी काही संबंध नसल्याची भूमिका पुजारी मंडळाने घेतलीय.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, तुळजाभवानी मंदिराचे 13 पुजारी पेडलर? आतापर्यंतचा घटनाक्रम पहा
महत्त्वाच्या बातम्या





















