Fish Market BMC: मुंबईतील वाकोला (धोबीघाट) (Vakola) येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) बंदी घातली आहे. मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते, असे कारण प्रशासनाने दिले आहे. तर पालिका अधिकाऱ्यांनी कोळी महिलांना (Koli Women) आता बाजारात मासे कापून न देता, केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती केली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. मासळी बाजारात मासे कापण्यावर अचानकघालण्यातआलेल्याया बंदीच्या निर्णयामुळेमासे विक्रेत्यांमध्ये संतापाचीलाटपसरलीआहे. तर अधिकाऱ्यांच्या यामनमानी कारवाईमुळे स्थानिक विक्रेत्यांचा संताप आता वाढला असून उपजीविकेवर परिणाम झाल्याची मच्छी विक्रेत्यांची तक्रार आहे. पर्यायी व्यवस्था न देता कारवाई केल्याचा आरोपहीयामासे विक्रेत्यांकडूनकरण्यातयेतआहे.

Continues below advertisement

दरम्यानया निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी जोरधरूलागलीआहे. तरदुसरीकडे अशी कारवाही झालीं असेल तर योग्य नाही, आम्ही त्यात लक्ष घालू अशीप्रतिक्रियामुंबईच्यामहापौर रितु तावडे यांनीदिलीआहे. तर काय लॉजिक, आम्ही कसं काय खायचं हे कोण ठरवणार, अशीप्रतिक्रिया विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदिलीआहे.

Fish Market BMC:  कोंबड्या किंवा मटण कापताना घाण होत नाही का? प्रशासनाचा अजब फतवा

Continues below advertisement

महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात कोळी महिलांनी संताप व्यक्त करत या निर्णयामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आणि रोजगारावर थेट परिणाम होणार असल्याचे म्हटलेआहे. परिणामीयाचा ग्राहकांवर देखील परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. अनेक ग्राहक साफ केलेले मासे घेण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. कोंबड्या किंवा मटण कापताना घाण होत नाही का? मग कारवाई फक्त कोळी महिलांवरच का? असा सवाल कोळी समाजाने उपस्थित केला आहे.

Akhil Chitre: मग चिकन घेताना पूर्ण जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का?

दरम्यानयाच विषयावर बोटठेवत ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत थेट शब्दांत सरकारवरटीका केली आहे. "कोळ्यांनी मासळी बाजारात मासे कापून विकू नये" असा निर्णय भाजपा-शिंदे गटाकडून घेतला जातो. का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईच्या खऱ्या मूळ रहिवासी म्हणजे आमच्या कोळीबांधवांच्या उदरनिर्वाहावर अशाप्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी बांधव मुंबईत मासे विकणार. तुमच्या नाकावर टिच्चून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आलेत त्याच पद्धतीने विकणार. मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करुन दाखवावीच. आम्हीही पाहून घेऊ कि मुंबईच्या खऱ्या मानकरींना कोण डिवचतं ते. आणि एक गोष्ट स्पष्ट करा मग चिकन घेताना पूर्ण जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का? मटण घेताना जिवंत बकरा घेऊन जायचा का? की नियम आणि अस्वच्छता फक्त मासळी बाजारासाठीच का?

Akhil Chitre: तुमचं लक्ष्य आता कोळीबांधवांना त्रास देण्याचं आहे, कारण...

असाखोचकसवाल अखिल चित्रे यांनीकेलाआहे. भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांनो, तुमचे मनसुबे आम्ही ओळखून आहोत. तुमचं लक्ष्य आता कोळीबांधवांना त्रास देण्याचं आहे. कारण कोळीवाड्याच्या जमिनीवर तुमच्या मालकाचा डोळा आहे, मालकापाशी तुमची लाचारी सिद्ध करायला तुम्ही असेच निर्णय घेणार, असेहीतेम्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या