Mumbai Accident News : अटल सेतूवरुन (Atal Setu) शिवडीला जात असताना एका कारचा भीषण अपघात (Accident)  झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सचिन हनुमंत खाडे  (Sachin Hanumant Khade) वय 36 असं मृत्यू झालेल्या युवकाचां नाव आहे. काल रात्री डंपरला कारने जोराची धडक दिल्यानं हा मोठा अपघात झाला. यामध्ये कार चालक बचावला असून त्यामधून प्रवास करणाऱ्या सचिन खाडेचा मृत्यू झाला आहे. 

Continues below advertisement


नियंत्रण सुटल्याने कार डंपरला धडकली


अटल सेतूवर (Atal Setu) भीषण अपघात (Accident)  झाला आहे. या कारमधून प्रवास करणारा व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये कार चालक बचावला आहे. गाडीचं नियंत्रण सुटल्याने गाडी थेट अटल सेतूहुन खाली येत असताना पाठीमागून डंपरला धडकली आणि गाडीचा चुराडा झाला. सचिन हनुमंत खाडे हे एका खासगी कंपनीत काम करत होते. सचिन खाडे यांचं मूळ गाव हे मांडवे, तालुका खटाव जिल्हा सातारा आहे. ते एका खासगी कंपनीत प्लांट मॅनेजर या पदावर काम करत होते. घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. खाडे हे मुंबईतील शिवडी या ठिकाणी राहत होते. त्यांच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. 


वरळी सी-लिंकवरही भीषण अपघात, पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू


दक्षिण मुंबईतील वरळी सी-लिंकवर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सागरी किनारा मार्ग (Coastal Road) आणि वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, याठिकाणी काही पोलीस कर्मचारी व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात होते. रस्त्यावरुन भरधाव वेगात जात असलेल्या एका कारने या पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव दत्तात्रय कुंभार असे आहे. ते वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गाडीच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने वोकहार्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेतले आहे.


महत्वाच्या बातम्या:


Mumbai Accident news: मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू