Mulund Bridge Collapse Accident News : मुलुंड मेट्रो अपघात प्रकरणात (Mulund Bridge Collapse Case) अद्याप दोन आरोपी फरार असून या फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी कोर्टात दिली आहे. 5 आरोपींना आज दादर शिंदेवाडी सुट्टीच्या कोर्टाने 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी स्लॅबचा भाग म्हणजेच स्लॅब तुटून पडला, तो कसा पडला, त्याला पकडून ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती का? याचा तपास करायचा आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलं. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करायची आहे, असेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. पोलिसनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागतली असता कोर्टाने 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mulund Bridge Collapse Accident News)

Continues below advertisement

Mulund Bridge Collapse Accident :  सुपरवायझरने लोखंडी खांब कापला अन् मेट्रोचा स्लॅब कोसळला

मुलुंड दुर्घटनेत मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो बांधकामाचा जो भाग कोसळला, त्याचा सपोर्ट देण्यात आलेले लोखंडी खांब कापला गेला, तेव्हा हे काम सुरू होते आणि सुपरवायजर भोईर वर उपस्थित होते. मुलुंड येथे वडाळा-कासारवडावली मेट्रोचा स्लॅब कोसळल्या प्रकरणी सगळ्या आरोपींना आज कोर्टात हजर केलं. दादरच्या शिंदेवाडी कोर्टात आरोपींना हजर करण्यात आलं. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर कार्यकारी अभियंता निलंबित करण्यात आला आहे. तसेच प्रकल्प संचालक हरीश चौहान, प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ आणि अवधूत इनामदार , उपव्यवस्थापक सौरभ सिंह पर्यवेक्षक प्रशांत भोईर यांचा यात समावेश आहे. या दुर्घटनेत उत्तर प्रदेश जौनपूरच्या बरसाथी गावचे सरपंच रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारांवर यापेक्षाही कठोर कारवाई व्हायला हवी

मुंबईतील मुलुंड येथील मेट्रो स्लॅब कोसळल्या प्रकरणी कंत्राटदाराला लावण्यात आलेल्या दंडा बद्दल भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी समाधान व्यक्त केलं. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारांवर यापेक्षाही कठोर कारवाई व्हायला हवी, असेही ते म्हणाले. संबंधित कंत्राटदाराला फक्त आर्थिक दंड नव्हे, तर त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात यावा, अशी मागणी ही बावनकुळेंनी केली.

ही बातमी वाचा: