Mulund Bridge Collapse Accident News : मुलुंड इथे झालेल्या दुर्घटनेनंतर (Mulund Bridge Collapse) एमएमआरडीएने (MMRDA) सखोल तपासणी करण्यासाठी एक विशेष पथ नेमलं आहे. हे पथक संपूर्ण कासारवडवली ते वडाळापर्यंत असलेल्या मेट्रो-4 मार्गिकेची सखोल तपासणी करणार आहे. या पथकाचे नेतृत्व एमएमआरडीएचे संचालक बसवराज एम करणार असून त्यांच्या सोबत अभिजित भिशीकर आणि मधुकर खरात हे अधिकारी डेप्युटी टीम लीडर म्हणून काम करणार आहे. त्यांच्या सोबत या पथकात प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी हेड, डेप्युटी सेफ्टी हेड, मेट्रो लाईन 9 आणि 5 चे सेफ्टी हेड, सेफ्टी इंजिनियर असे दहा ते बारा अधिकारी देखील असणार आहे.
MMRDA : एमएमआरडीएकडून विशेष पथकाची नेमणूक, पथक नेमकं काय करणार?
दरम्यान, आज पासून पुढील 3 ते 4 दिवस किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत हे पथक अहोरात्र काम करणार आहे. त्यांच्या तपासणीचे, साईट विझिटचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. या पथकाचे मुख्य काम सखोल बारकाईने तपासणी करून काल झालेला अपघात पुन्हा होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आणि ज्या ठिकाणी काही चुकीचे अथवा नियमांचे उल्लंघन करून किंवा धोकादायक काम सुरू असेल तिथे ते थांबवणे आणि योग्य रित्या काम सुरू करून घेणे हे असेल.
अशातच, तपासणीच्या वेळी नुकत्याच झालेल्या अपघातासारखे स्लैब, स्लैबचे तुकडे, बांधकाम साहित्य, सिमेंटचे भाग या आणि अश्या इतर गोष्टी धोकादायक स्थितीत दिसून आल्यास लगेच कारवाई करणे आणि काढून टाकणे, हे देखील या पथकाचे मुख्य काम असेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर या पथकाचे प्रमुख एक रिपोर्ट बनवून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार, या रिपोर्ट मध्ये कुठे कुठे धोकादायक स्थितीत गोष्टी आढळल्या, त्यावर काय कारवाई केली, मेट्रोच्या बांधकामात तपासणीवेळी काय काय दिसून आले, हे सर्व रिपोर्टमध्ये द्यावे लागणार आहे.
Mumbai LBS Road Accident : नेमकं काय घडलं?
दुर्घटनांनी अनेकदा हादरलेली मुंबई पुन्हा एकदा एका अपघातानं हादरली आहे. मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेत. तसंच तीन वाहनं स्लॅबखाली दबली गेली.
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला. एलबीएस रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर बंद करण्यात आली होती. एमएमआरडीए या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करत आहे. वेगवेगळ्या चार टप्प्यांचे 4 वेगवेगळे कंत्राटदार आहेत. दरम्यान, या अपघातानंतर बंद करण्यात आलेला एलबीएस मार्ग तब्बल सात तासांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
ही बातमी वाचा: