एक्स्प्लोर

लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी थेट सांगून टाकलं; गोंधळ केला दूर!

लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यातील सन्मान निधी आता महिलांना देण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना 1500 रुपये मिळतील. दरम्यान, निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींना नेमका किती निधी मिळणार, असे विचारले जात होते. याबाबतच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती सांगितली आहे. 

लाडक्या बहि‍णींना डिसेंबर महिन्यात नेमके किती रुपये मिळणार?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना 2100 रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित केलेला लाभ होता तो आता वितरित करण्यात येत आहे. त्याची सुरुवात केलेली आहे. नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळालेला आहे. डिसेंबर महिन्यातील लाभाच्या वितरणाची सुरुवात आता केलेली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पोहचलेला असेल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. 

नव्या रजिस्ट्रेशनची सुरुवात कधी होणार?

म्हणजेच नवीन लाभार्थींच्या नोंदणीच्या नोंदणीची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्याचं दिसतंय. यावरही आदिती तटकरे यांनी यांनी एबीपी माझाला माहिती दिली. "रजिस्ट्रेशनची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर होती. 15 ऑक्टोबरपर्यंत अडीच कोटी महिलांनी नोंद केलेली आहे. अद्यापपर्यंत पुन्हा रजिस्ट्रेशनला सुरुवात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. सध्यातरी नोंदणी केलेल्या महिला, पात्र महिलांपर्यंत सन्माननिधी पोहोचवण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. ज्या महिलांचे अर्ज मान्य झालेले आहेत. पण आधार सिडिंगमुळे ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही, त्या महिलांना कसा लाभ मिळेल याकडे सध्या लक्ष केंद्रित केलेले आहे. आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरु करण्याचा निर्णय सध्यातरी झालेला नाही," अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. 

सरसकट अर्जांची पडताळणी होणार का?

लाभार्थी महिलांचा अंदाजित आकडा आणि रजिस्ट्रेशनची संख्या लक्षात घेऊन रजिस्ट्रेशन चालू करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. ज्या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाल्या की आम्ही अर्जांची पडताळणी करू. पण सरसकट अर्जांची पडताळणी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आलेला नाही.  

हेही वाचा :

लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू

Maharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
Embed widget