Mufti Salman Azhari Live Updates : मुस्लिम धर्मगुरु अजहरींचे गुजरातमध्ये आक्षेपार्ह भाषण, समर्थकांचा राडा, 5 जणांना अटक
Mufti Salman Azhari : मुस्लिम धर्मगुरु तसेच इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरींच्या अटकेनंतर तणाव वाढल्याचं पहायला मिळालं.
Mufti Salman Azhari : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या मुफ्ती मोहंमद सलमान अजहरींना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर त्याच्या समर्थकांनी राडा केला होता. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात आता पर्यंत पाच जणांना अटक झाली असून इतरांचा शोध सुरू आहे. सलमान इश्तीयाक अली सय्यद, अजीम शमियुल्ला शेख, मोहम्मद शबीर लाल मोहम्मद, मोहम्मद बिलाल अब्दुल रहमान काझी, अब्दुल रहमान अब्दुल्ला काझी अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना काही वेळा पूर्वी विक्रोळी न्यायालयात नेण्यात आले आहे.तर पोलीस सीसीटीव्ही आणि कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीने इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
Mufti Salman Azhari Live Updates : मुस्लिम धर्मगुरु अजहरींचे गुजरातमध्ये आक्षेपार्ह भाषण, आतापर्यंत 3 जणांना अटक, मुंबई पोलिसांची चौकशी सुरू
Mufti Azhari : मुस्लीम धर्मगुरु तसेच इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरींना (Mufti Salman Azhari) रविवारी गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पहायला मिळालं. यानिमित्त राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. सह्याद्रीवरती पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि देवेन भारती यांची बैठक पार पडली
Mufti Salman Azhari Update : इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केल्यानंतर रविवारी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर अजहरीच्या समर्थकांचा मोठा जमाव जमल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरु होती. या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. मुफ्ती सलमान अजहरींना 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर गुजरातला नेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही गोळा केले असून, गोंधळाच्या व्हिडिओवरून लोकांची ओळख पटवली जात आहे.
Mufti Salman Azhari : गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुस्लीम धर्मगुरु तसेच इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरींना ( (Mufti Salman Azhari) रविवारी गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) घाटकोपरमधून अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पहायला मिळालं. मिळालेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलीस मुफ्ती सलमानला घेऊन मध्यरात्रीच गुजरातला रवाना झाले. तसेच त्यांना दोन दिवसाची ट्रांझिट रिमांड देण्यात आली असल्याची माहिती वकील आरिफ सिद्धिकी यांनी दिली आहे, तसेच मुंबई पोलीस अजहरींना गुजरात बॉर्डर पर्यंत सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
Mufti Salman Azhari : अजहरींचे आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल
जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अजहरी यांनी भाषण देताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात एटीएसने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना मुंबईतून अटक केली.
पार्श्वभूमी
Mufti Salman Azhari Live Update : गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुस्लिम धर्मगुरु तसेच इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरींना ( (Mufti Salman Azhari) रविवारी गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) घाटकोपरमधून अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पहायला मिळालं. मिळालेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलीस मुफ्ती सलमानला घेऊन मध्यरात्रीच गुजरातला रवाना झाले. तसेच त्यांना दोन दिवसाची ट्रांझिट रिमांड देण्यात आली असल्याची माहिती वकील आरिफ सिद्धिकी यांनी दिली आहे, तसेच मुंबई पोलीस अजहरींना गुजरात बॉर्डर पर्यंत सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -