एसटी महामंडळाकडून पुणे विभागातील शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारांतील बसमध्ये प्रायोगिक तत्वावर वायफाय सुविधा देण्यात आली होती. आता राज्यातील सर्व 18 हजार बसमध्ये वायफाय बसवण्यात येईल. एसटी महामंडळानं यासाठी एका कंपनीशी करार केला आहे. पाच वर्षांसाठी हा करार असेल. वायफाय सेवेसाठी प्रतीवर्ष महामंडळ एक कोटी रुपये मोजणार आहे.
जानेवारी 2017 पासून एसटी बसमध्ये वायफाय बसवण्यास सुरुवात करण्यात येईल. यासाठी महामंडळाकडून विविध पथकंही बनवण्यात येणार असून लवकरच प्रवाशांना एसटी बसमध्ये मोफत वायफाय वापरता येणार आहे.