Solapur Success Story: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024च्या (MPSC 2024 Results) अंतिम निकालात सोलापूर जिल्ह्याचा दबदबा पाहायला मिळाला असून सात पैकी एकाच जिल्ह्यातून (Solapur) चार उपजिल्हाधिकारी होण्याचा मान सोलापूरच्या पोरांनी पटकावला आहे. या ‘सुपर हिट’ निकालात सोलापूरचा नाद खुळा हेच दिसून येत आहे. राज्यातील उपजिल्हाधिकारी पदाच्या सात जागांपैकी तब्बल चार जागांवर सोलापूरच्या सुपुत्रांनी नाव कोरले आहे.
तर विजय लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा रोवला आहे. यासोबतच मुलींमध्ये आरती जाधव हिनेही अव्वल येत सोलापूरचा झेंडा उंचावला आहे.याचबरोबर पवन मंगरूळे आणि अमित लोकरे यांनीही उपजिल्हाधिकारी पद मिळवत जिल्ह्याच्या यशात भर घातली आहे. एकाच जिल्ह्यातून चार उपजिल्हाधिकारी सोलापूरचे असून राज्याच्या टॉपर लिस्टमध्ये सोलापूरची दमदार एंट्री झाली आहे. यानिकालानंतर संपूर्ण सोलापूरजिल्ह्यातआनंदव्यक्तकेलाजातअसून जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचीभावनाआहे. स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करणाऱ्या मुलांचे मनोबल यामुळे उंचावले जाणार आहे.
MPSC Result 2024: कट-ऑफमुळे उमेदवारांमध्ये चर्चेचा विषय
राज्यसेवा मुख्य परीक्षा एमपीएससीतर्फे 27 ते 29 मे 2024 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1,516 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया 30 ऑक्टोबरपर्यंत पार पडली. त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला. एकूण 7,970 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 7,732 उमेदवारांनीच मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला. विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने अर्जप्रणाली खुली ठेवत उर्वरित पात्र उमेदवारांना संधी दिली होती. यंदाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट-ऑफ इतिहासातील सर्वाधिक राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. या परीक्षेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी कट-ऑफ 507.50 गुणांवर, अनुसूचित जातीसाठी 447 गुणांवर, तर अनुसूचित जमातीसाठी 415 गुणांवर गेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या उच्च कट-ऑफमुळे आश्चर्य व्यक्त करत “स्पर्धा अधिक तीव्र झाली” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
MPSC Result 2024: विजय लमकणे राज्यात पहिला, प्रगती जगताप एससी प्रवर्गातून अव्वल
राज्यात पहिला क्रमांक पटकावणारे विजय नागनाथ लमकणे हे यापूर्वीही एमपीएससीच्या माध्यमातून विविध सेवांमध्ये निवड झालेले आहेत. सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI