Udayanraje Bhosale : राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांना उद्देशून गरळ ओकणारी वक्तव्ये येतच असल्याने भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला. सरकारकडे अशा लोकांची 'नसबंदी' करण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली. बेताल वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात कायदा याच अधिवेशनात आणून दहा वर्षांच्या शिक्षेचा कायदा करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. उदयनराजे यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्यांवरून आज सातारमध्ये पत्रकार परिषद घेतली.

सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा आणावा




पत्रकार परिषद बोलताना उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा आणावा, असा कायदा आणण्यासाठी समिती नेमावी अशी सूचना सुद्धा  भोसले यांनी केली. कायदा करून बेताल वक्तव्य करणाऱ्यांना दहा वर्षे शिक्षा करा अशी मागणी उदयनराजे यांनी केली. प्रशांत कोरटकरवरून उदयनराजे यांनी समाचार घेत विकृत लोकांना कोणती जात पक्ष नसतो असे सांगत भाजपचा बचाव केला. दरम्यान, सिमेटिक लिबर्टीवर बोलताना उदयनराजे यांनी सांगितले की, सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा आणावा. यासाठी समिती नेमण्यात यावी, तसेच शासनमान्य इतिहास समोर आणल्यास लोकांची नसबंदीच होऊन जाईल अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी महापुरुषांना विरोधात गरळ ओकणाऱ्यांना सुनावले. 


मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका


कोणाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण असले तरी एखाद्याची मानसिकता झाली की मेलो तरी चालेल पण याला खलास करणार तर कोणीही रोखू शकत नाही, अशी वेळ येऊ देऊ नका असा इशारा सुद्धा उदयनराजे भोसले यांनी दिला. उदयनराजे यांनी औरंगजेबावरून सुद्धा खडे बोल सोनावले. ते म्हणाले की औरंगजेब काही देव नव्हता, तो इथला नव्हता. शिवाजी महाराजांनी धर्मस्थळ जपण्याचे काम केले. यांनी विरोधात काम केले, मग यांची समाधी कशाला जपायची? असं सुद्धा म्हणाले. तो लुटेरा होता, चोर होता असे उदयनराजे यांनी सांगितले. औरंगजेबच्या समाधीला जास्त पैसे देण्यात आल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.


इतर महत्वाच्या बातम्या