नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज (शनिवार) संसदेत मतदान पार पडलं. या निवडणुकीत 785 खासदारांपैकी 771 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी 14 खासदारांनी मतदान केलेलं नाही. यामध्ये साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंचाही समावेश आहे.
संसदेतील अधिवेशनालाही उदयनराजे भोसलेंची बऱ्याचदा उपस्थिती नसल्याचं दिसून येतं. हाच शिरस्ता त्यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानावेळीही कायम ठेवला आहे.
मतदानासाठी खा. प्रीतम मुंडे अमेरिकेतून दिल्लीत
तर दुसरीकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे या थेट अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाल्या. अमेरिकेतून दिल्ली एअरपोर्ट, तिथून थेट संसदेत असा प्रवास करत त्या लगबगीने वेळ संपायच्या आधी पोहचल्या आणि मतदानाचा हक्क बजावला.
व्यंकय्या नायडू यांचा विजय जवळपास निश्चित
दरम्यान, एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्यांना एकूण 785 पैकी 516 मतं मिळवली, तर यूपीएचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांना 244 मतं मिळाली.
एनडीएचं संख्याबळ पाहता व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित मानला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदारांनी संसदेत आज आपला मतदानाचा हक्क बजावला.
संबंधित बातम्या :
उपराष्ट्रपती निवडणूक : मतदान संपलं, काही तासात निकाल
उपराष्ट्रपती निवडणूक : खा. उदयनराजे भोसले मतदानाला गैरहजर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2017 07:15 PM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज (शनिवार) संसदेत मतदान पार पडलं. या निवडणुकीत 785 खासदारांपैकी 771 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -