Madha Loksabha Election News : माढा लोकसभा मतदारसंघात (madha loksabha election) सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel mohite patil) शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपच्या अडचणीत वाढ झालीय. विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांच्यावर नाराज आहेत. याचा पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल हे खास विमानाने नागपूरकडे रवाना झालेत. त्यांची उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक आहे.  


राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळला जात नाही


महायुतीत राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळला जात नाही. याबाबतची तक्रार खासदार निंबाळकर फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. माढ्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरोधी काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत होणार नाही अशी आक्रमक भूमिका खासदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, खासदार रणजितसिंह निंबाळकर, राहुल कुल, जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या भेटीला नागपुरात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतो, याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Jaysingh Mohite Exclusive : आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही, शरद पवारांची भेट घेताच मोहिते पाटलांचा यल्गार, माढाच नाही तर सोलापूर आणि बारामतीमध्येही गुलाल उधळण्याचा संकल्प