Praniti Shinde : येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुम्हालाच मिळेल, हीच एका काँग्रेसच्या लाडक्या बहिणीकडून शुभेच्छा असल्याचे मत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी व्यक्त केलं. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip mane) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे बोलत होत्या. वय कितीही असलं तरी दिसलं न पाहिजे. पहाटे लवकर उठणं, शाकाहारी खाणे आणि लवकर झोपने हेच त्यांच्या तरुणपणाचं कारण असावं असावं असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
चूक दुरुस्त करुन तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये
काही लोकांच्यामुळं मागच्या वेळी चूक झाली होती. पण ती चूक दुरुस्त करुन तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये परत आल्याचे शिंदे म्हणाल्या. पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. पहाटे लवकर उठणं, शाकाहारी खाणे आणि लवकर झोपने हेच त्यांच्या तरुणपणाचं कारण असावं असेही प्रणिती शिंदे दिलीप माने यांना म्हणाल्या. साहेब आणि माझ्यामध्ये फरक असल्याचे तुम्ही म्हणालात. कारण शिंदे साहेबांनी आम्हा सर्वांपेक्षा ही तुमच्यावर दुप्पट प्रेम केल्याचे शिंदे म्हणाल्या. संसदेत गेल्यावर अनेक जण म्हणतात की तुम्ही शिंदे साहेबांची मुलगी आहे का? असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
दिलीप माने हे 62 वर्षाचे असून 24 वर्षाच्या युवकाप्रमाणे काम करतात : राजन पाटील
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील हेदेखील व्यासपीठावर आहेत. राजन पाटलांनी काँग्रेसच्या दिलीप माने यांना दोन तीन महिन्यात आशीर्वाद द्यावा असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, दिलीप माने आणि मी अनेक वर्षांपासून मित्र असल्याचे राजन पाटील म्हणाले. दिलीप माने हे 62 वर्षाचे असून 24 वर्षाच्या युवकाप्रमाणे काम करतात असे राजन पाटील म्हणाले. महायुतीतील सहयोगी पक्षाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्याला निवडून देण्याच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे दिलीप माने हे भाजपचे दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहे.दिलीप माने सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र, मागच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळं काही काळ सोलापूर काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, आता पुन्हा दिलीप माने यांनी घरवापसी केली आहे. ते विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: