नवी दिल्ली : भारतात मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने (Corona) हाहाकार माजवला आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून आता ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटनेही डोकं वर काढल्याने सर्वांची चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान केंद्र सरकार (Cenral Govt.) लसीकरणासह इतर उपाययोजना राबवत आहे. अशावेळी केंद्राच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत खासदार अमोल कोल्हेंनी (MP Amol kolhe) पंतप्रधान मोदींवर (PM Modi) थेट निशाणा साधला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर पंतप्रधान मोंदीचा फोटो असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची जबाबदारीही घ्या' अशी आक्रमक टीका कोल्हेंनी केली आहे. लोकसभेच्या आजच्या चर्चेत कोल्हे बोलत होते.


काय म्हणाले खा. कोल्हे?


लोकसभेतील (Loksabha) आजच्या चर्चेत खासदार अमोल कोल्हे यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्याबाबत केंद्र सरकारने कशाप्रकारे कामगिरी करणं आवश्यक आहे, याबद्दल स्पष्ट केलं. कोल्हेंनी यावेळी कोणत्याही युद्धात काही नियम असतात ज्यांनी युद्ध जिंकता येतं असं सांगतिलं आहे. यावेळी युद्धाचे सेनापती अर्थात पंतप्रधान मोदी यांनी सर्व संकटात पुढे उभे राहून सामना करणं आवश्य़क असल्याचं म्हटलं आहे. यावेळी मृत्यूसारख्या गोष्टींची जबाबदारी घेऊन उपाययोजना करण्यावरही भर द्यावा असंही म्हटलं आहे.



सुप्रिया सुळेंचाही पंतप्रधानांवर हल्लाबोल


खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनीही मोदींच्या लसीकरण प्रमाणपत्रावर (Vaccination) फोटोबाबत टीका केली. यावेळी प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो असल्यास राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा (Cheif Minister) फोटो का नाही? असा सवाल उपस्थित केला. 


संबंधित बातम्या :