मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून राज्यातील मंडप डेकोरेशन यांना मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्याची अजून कुठलीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मंडप डेकोरेशन सभागृह त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यवसायीकामध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे किमान पाचशे लोकांना परवानगी देऊन आम्हाला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत व्यवसायीकांनी राज्यभरात जोरदार आंदोलन केले आहे.
सांगली :
लॉकडॉऊनचा फटका बसलेल्या मंडप,लाईट आणि डेकोरेटर्स व्यवसायिकांनी विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन केलेय .धरणे आंदोलन करत व्यवसायिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासह लग्नसमारंभाची असणारी मर्यादा वाढवण्यात यावी,अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यात मंडप,लाईट आणि डेकोरेटर व्यावसायिकांचे 100 कोटींहूनचे अधिक नुकसान झाले आहे.त्यामुळे मंडप,लाईट आणि व्यवसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जिल्ह्यातील सुमारे 1200 मंडप,डेकोरेटर्सचा व्यवसाय ठप्प झाला आहे यामुळे मंडप व्यावसायिकांचे साहित्य हे अक्षरशः धूळ खात पडले आहे.यातच सरकारने लग्न कार्यासाठी 50 लोकांना परवानगी दिली असल्याने मंडप व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता 50 लोकांची मर्यादा उठवून 500 करावा आणि व्यवसायिकांच्या झालेल्या नुकसानाची दखल घेऊन शासनाने मंडप लाईट आणि डेकोरेटर्स व्यवसायिकांना आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आला आहे. शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी जिल्ह्यातील मंडप,लाईट आणि डेकोरेशन व्यवसायिकांनी धरणे आंदोलन केले.
पालघर :
लग्न उत्सव समारंभ याठिकाणी 50 ऐवजी 500 लोकांना परवानगी देऊन मंडप व डेकोरेटर व्यवसायाला उभारी देण्याची मागणी पालघर जिल्ह्याच्या मंडप डेकोरेटर असोसिएशनने केली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
वाशिम :
लॉकडाऊन लागल्यापासून विवाह संघर्ष सेवा समितीचे सगळे व्यवहार ठप्प झाले आहे. गेल्या चार महिन्यापासून राज्यातील एक एक करून सर्व व्यवसाय वरील निर्बंध हटवले असताना मंडप डेकोरेशन, आचारी यांच्यासह अन्य व्यवसायिकांना उपासमारी ची वेळ आली आहे. कुठलच अनुदान न देता मंडप डेकोरेशन वर लग्नाकरता घातलेले निर्बंध उठवण्याच्या मागणी साठी जिल्ह्यातील 130 विविध संबंधित व्यवसायाशी निगडित असलेल्या संचालकांकडून तालुकास्तरावर आंदोलन उभारण्यात आले आहे.