Monsoon Rain IMD News: मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. परतीच्या मान्सूनने पंजाब, हरियाणा व राजस्थानचा काही भाग ओलांडला आहे. तर महाराष्ट्रातून हा परतीचा मान्सूनचा (Maharashtra Monsoon Rain News) प्रवास 5 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे. अशातच, बहुतांश वेळा परतीचा मान्सून महाराष्ट्र्रात पाऊस (Maharashtra Rain) देऊन जातो. मात्र सध्या भारतावर प्रतिचक्रवाद स्थिती तयार झाली आहे. जी ढगांना एकत्र येऊ देत नाही. त्यामुळे परतीचा मान्सून महाराष्ट्रात पाऊस देण्याची शक्यता नसल्याचे नागपूर वेध शाळेने (IMD) सांगितले आहे. परिणामीमहाराष्ट्राच्याआणिविशेषतः शेतकतऱ्यांच्यावाट्यालानिराशाचदेणाराअसल्याचेबोललंजातआहे. त्यामुळेएकीकडेमहाराष्ट्र दुष्काळाच्याझळासोसतअसतानाआगामीकाळअधिकअडचणींचाठरणारअसल्याचीशक्यताआताअधिकवाढलीआहे.
India Monsoon Rain Update: महाराष्ट्रासह 18 राज्यांचा रेड झोनमध्ये समावेश; 20 टक्क्यापेक्षा जास्त पावसाची तूट
सध्या देशात ओडिसा हे एकमेव राज्य आहे, जेथे सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर महाराष्ट्रासह 18 राज्य असे आहे जेथे 20 टक्क्यापेक्षा जास्त पावसाची तूट असल्याचेआकडेवारीनुसारसमोरआलंआहे. परिणामीया 18 राज्यांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. तिकडे पश्चिम विदर्भात तर परिस्थिती आणखी बिकट आहे. अकोलाआणि अमरावती जिल्ह्यात पावसाची तूट हि 40 टक्क्यापेक्षा अधिकवर पोहचली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊसच झाला नाही. सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे चारही महिने कोरडेच गेले आहेत. दीड महिने तर राज्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला, पण तोही समाधानकारक नव्हता. त्यामुळे राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे.
Rain News Update : एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद
हवामान खात्याच्या दाव्यानुसार, एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यावरुन राज्यातील संकट किती मोठं आहे, हे दिसून येतं. पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीवरही संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. एक दशकानंतर राज्यात या वर्षी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा राज्यातील पावसाची सरासरी तूट 18 टक्के आहे. राज्यातील सर्वच विभागात यावर्षी पावसाची कमी जास्त प्रमाणात तुट निर्माण झाली आहे. मात्र, येणाऱ्या 5 ते 6 दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची कमी शक्यता. असं असलं तरी राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच रब्बी हंगामात पेरणी करावी, असा सल्ला एस.डी. सानप यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
