त्यामुळे नागपूरमध्ये विदर्भावरुन दोन गट बघायला मिळत आहेत. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या नकाशाला जोडेही मारले. ज्या व्हरायटी चौकात हे आंदोलन करण्यात आलं तिथेच सकाळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या पुतळ्यांचं आंदोलन केलं होतं. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय मनसेच्या आंदोलनातही बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते उपस्थित होते.
विदर्भवाद्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत, पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. त्यामुळं विदर्भवादी नेत्यांना पत्रकार परिषद बंद करण्याची वेळ आली.