सोलापूर : विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यावर बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याचा आरोप होत आहे. दिलीप माने यांचा भाचा निखिल भोसलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याला मदत केल्याप्रकरणी माने यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बलात्कार करुन फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद तक्रारदार महिलेने न्यायालयात दाखल केली आहे. शिवाय दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण वर्षभरापूर्वीचं आहे. निखिल भोसलेने तक्रारदार महिलेशी मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन ओळख वाढवून मैत्री केली. नंतर तुळजापूर मंदिरात खोटं लग्न करुन पुणे-सोलापूर हायवे रोडजवळच्या एका रुममध्ये शारीरिक संबध ठेवले. त्याचवेळी महिलेचे नग्नावस्थेतील फोटो काढून सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली. आरोपींनी सोलापूर आणि मुंबईतील व्हॉटसअॅप ग्रुपवर फोटो टाकल्याचा दावा महिलेने केला आहे.
दिलीप माने यांनी आरोप फेटाळले
दरम्यान दिलीप माने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. वर्षभरापूर्वी एका नातेवाईकावर असा गुन्हा दाखल झाला होता. ज्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे तिने असे तीन गुन्हे वेगवेगळ्या लोकांवर दाखल केले आहे. शिवाय यात माझंही नाव देण्यात आलं होतं. पण पोलिस तपासात त्यांचा कुठेही सहभाग न आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता, असा दावा दिलीप माने यांनी केला आहे.
तसंच विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी हा विषय मुद्दाम उकरुन काढल्याचा आरोप दिलीप माने यांनी केला आहे. शिवाय संबंधित महिलेवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं माने यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
निष्ठावंत माधव भांडारींऐवजी ‘लाड’ यांना उमेदवारीचा ‘प्रसाद’ का?
संपूर्ण घटनाक्रम : … आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!
विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी
राणेंबाबत संभ्रम कायम, भाजपकडून इतर उमेदवारांची चाचपणी
विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट?
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’वर
राणे आणि मुख्यमंत्र्यांची भेट, विधानपरिषद पोटनिवडणुकीवर चर्चा?