Suresh Dhas : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत. इंटरनॅशनल स्पीकरवर बोलण्याची माझी लायकी नाही असा टोला भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संजय राऊतांना लगावला. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गड जमिनी संदर्भात सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळ्यासंदर्भात मी 20 तारखेला बोलणार आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमचे दैवत आहे. ते माझ्यावर रागावून बोलले, त्यामुळं मी त्यांच्यावर काही बोलणार नाही असेही धस म्हणाले.
20 तारखेला सर्व प्रश्नांवर बोलणार
बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गड जमिनी संदर्भात सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. परिसरातील गाळ उपसा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती धसांनी दिली. यासह मतदारसंघातील विविध प्रश्नां संदर्भात बैठक घेतली. जिल्हाधिकारी लवकरात लवकर त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहेत असे धस म्हणाले. मी 20 तारखेला सर्व प्रश्नांवर बोलणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी संदर्भात मी 20 तारखेला बोलणार आहे असे धस म्हणाले. सरकारने गाळ काढण्याचे धोरण सुरु केले आहे. आमच्या भागातील देखील काही प्रकल्पातील गाळ काढायचा आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतच त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता यावर धस काय बोलणार याकडं देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील आमचे दैवत
आज मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची बैठक सुरु आहे. मी 20 तारखेला याबाबत बोलणार आहे. तसेच कृषी विभागातील घोटाळ्यासंदर्भात देखील मी बोलणार आहे. मस्साजोगच्या नागरिकांची बैठक सुरु असून, त्यामध्ये काय निर्णय होतो, ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परवा शिवजयंती आहे. त्यामुळं त्या दिवशी बाकीच्या गोष्टी नको. त्यामुळं मी 20 तारखेला माझी भूमिका मांडणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु असतात असेही धस म्हणाले. मनोज जरांगे पाटील आमचे दैवत आहे. त्यांच्यावर मी काहीही बोलणार नाही असे सुरेश धस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: