Sadabhau Khot: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 559 जागांच्या नोकर भरतीवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्याच सरकारमधील सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्र्यांनाच घेरताना एका जागेसाठी तब्बल 30 लाख रुपये दर ठरवला गेल्याचा आरोप केला आहे. सदाभाऊ यांनी सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरतीला विरोध केला असून एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेऊन भरती करा, अशी मागणी केली. सदाभाऊ खोत यांनी भरतीला विरोध करतानाच सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेऊ नये, अन्यथा सहकार मंत्र्यांच्या दारात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. सदाभाऊ खोत म्हणाले की, सहकार मंत्री राष्ट्रवादीतूनच असल्यामुळे त्यांना त्यांचा गोतावळा सांभाळायचा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या