भंडारा : शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध अपात्रतेसंदर्भात खटले दाखल करण्यात आले. आमदार अपात्रता प्रकणावर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे उद्या (10 जानेवारी 2024) अंतिम निकाल देत आहेत. यावर बोलताना शिंदे गटाचे भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar ) यांनी निकाल विरोधात आला तरी, सरकारला काहीचं फरक पडणार नाही. मात्र, निकाल विरोधात आला तरी, उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. विरोधकांनी थोडं थांबावं आणि निकालाची वाट बघावी, असा सल्ला भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विरोधकांना दिला आहे.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे अपात्र ठरतील आणि राज्यातील मुख्यमंत्री बदलतील, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. यावर बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी, मुख्यमंत्री कसे बदलतील? दोन गोष्टी आहेत. एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. समजा निर्णय सरकार विरोधात दिले तर, सरकारसुद्धा कोर्टात जातील. सरकारच्या समर्थनार्थ दिले तर, सरकारचा काही विषय नाही. जसं त्यांना (विरोधकांना) मार्ग मोकळे आहेत, त्यांना सुद्धा न्याय मागण्याचे अधिकारी आहेत, तसेच यांना सुद्धा न्याय मागण्याचे अधिकार आहेत. त्याच्यामुळं कींतू परंतु पेक्षा मला वाटतं की आपण इतकं दिवस थांबलो तर, आणखी दोन - चार दिवस थांबलो पाहिजे. ही न्यायिक बाब आहे, अध्यक्षांनी जे काही ठरवलं असेल, या न्यायिक बाबीत आपण खूप जास्त उतावीळ सारखं आपण त्याच्यावर टीकाटिप्पणी करणं हे न्यायिक देवतेला हस्तक्षेप केल्यासारखं आहे. त्यामुळं जे न्यायदेवता आहे किंवा घटनेनं ज्यांना न्याय देण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यांना न्याय देवू द्यायला पाहिजे, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी वक्तव्य केलं. 


जर निकाल निगेटिव्ह आला तर, आम्हाला पण न्याय मागण्याचा अधिकार आहे. विरोधक ज्या पद्धतीनं म्हणतात की, कोर्टात जावू, तर आम्हाला पण कोर्टात जाता येतं. निकालाचा सरकारला काहीच फरक पडत नाही. हे जे होतंय, ते फक्त प्रेशर बनविण्याचं काम सुरू आहे, बाकी काही नाही. 210 मध्ये 16 अपात्र जरी झाले तरी सरकारमध्ये काहीचं फरक पडत नाही. अपात्र जरी झालं तरी, कोर्टात दाद मागता येईल, अशी आशा शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.


 आमदार भोंडेकर पहिल्या दिवसांपासून शिंदेंसोबत
भंडारा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासून शिंदे गटात गेलेत. शिवसेनेत बंडखोरी करून ज्यावेळी शिंदे गटाचे सर्व आमदार सुरत मार्गे गुवाहाटी गेले, तिथे आमदार भोंडेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता, हे विशेष.