Jitendra Awhad : तुम्ही दाऊदला फरफटत अणणार होते. मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आहे? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट मुंडे यांचे नाव घेतल्याचे आव्हाड म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आव्हाड म्हणाले. लोकांची मेमरी शॉर्ट आहे. लोकं विसरून जातील. याची ते वाट पाहत आहेत असेही आव्हाड म्हणाले. 302 मध्ये वाल्मिक कराड यांचं नाव नाही. मोक्का लावू असं सभागृहात सांगितलं होतं मात्र अद्याप काहीच हालचाली नसल्याचे आव्हाड म्हणाले.
302 चा गुन्हा दाखल मात्र त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नाही
संतोष देशमुख हत्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यामुध्ये वाल्मिक कराडचे नाव नसल्याचे आव्हाड म्हणाले. सभागृहात तुम्ही सांगून देखील या प्रकरणात अद्याप काही कारवाई नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतली नाही असेही आव्हाड म्हणाले. उलट सभागृहात अजित पवार यांनी सुरेश धस यांना डोळा डोळा म्हणत खुणवत होते असे आव्हाड म्हणाले. त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही असे आव्हाड म्हणाले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर पवारसाहेबांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते असे आव्हाड म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेते करताना दिसत आहेत. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं. अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग, पोलिस यंत्रणा व सरकावर वाढत असलेला राजकीय, सामाजिक दबाव लक्षात घेत आता वाल्मिक कराड शरण येत असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या:
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी