MLA Balaji Kinikar : अंबरनाथचा इतिहास आहे, की इथं काही नगरसेवकाचाही येथे खून झालेला आहे. तसा प्रयत्न माझ्या बाबतीत होणार होता. मात्र वेळीच कट उघड पडला असल्याचे वक्तव्य अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर (MLA Balaji Kinikar) यांनी केलं. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पोलीस दल यांच्यातचील दोषी लोकांना निश्चितच समोर आणतील असेही किणीकर म्हणाले.
विवाह सोहळ्यात हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची किणीकर यांची माहिती
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचा हत्येचा कट रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टर बालाजी किणीकर हे आज लातूर येथे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. याच विवाह सोहळ्यात त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती आहे. आमदार बालाजी किणीकर हे आज लातूर येथे आले असता त्यांनी स्पष्ट केले की, काही दिवसापूर्वी अतिशय जवळच्या माणसाने हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मला मिळाली होती. ती माहिती मी तात्काळ पोलिसांना कळवली होती. आमचे नेते एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली होती. अंबरनाथचा पूर्व इतिहास अनेक नगरसेवकांच्या हत्येचा आहे. तसा माझ्या बाबतीतही कट रचला जात होता. मात्र, वेळीच तो कट उघड झाला आहे. यातील सूत्रधार कोण आहेत, त्यापर्यंत पोलीस नक्कीच पोहोचतील असा मला विश्वास असल्याचे किणीकर म्हणाले.
अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट
अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून किणीकर (Balaji Kinikar) हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मा,त्र याबाबत अद्याप आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: