Mira Bhayander News : मिरा-भाईंदरमधील उड्डाण पुलाच्या डिझाईनवरुन (Flyover In Mira Bhayander) जगभर ट्रोल होत असताना, आता सार्वजनिक शौचालयाच्या एका डिझाईनवरुन (Toilets Design) सोशल मिडियात मिरा भाईंदर पुन्हाएकदा ट्रोल (Social Media Trolling) होत आहे. उड्डाणपूलाची डिझाईन एमएमआरडीएन बनवली होती, तर या शौचालयाची डिझाईन आणि बांधकामही एमएमआरडीए ने बनवलं असल्याची माहिती मिळत आहे. 2007 साली हे कमोड बनवले असून, आता ते सोशल मिडीयाद्वारे निदर्शनास आल्याने ते सध्या जास्त ट्रोल होत आहेत.
Mira Bhayander Toilets Design : शौचालयाच्या डिझाईन बाबत ट्रोल; नेमकंप्रकरणकाय?
भाईंदर (पूर्व) येथील आरएनपी पार्क, एस.व्ही. रोड परिसरात एक सार्वजनिक शौचालय एमएमआरडीने 2007 साली निर्मल भारत अभियान योजनेद्वारे बनवल्याची माहिती मिरा भाईंदरचे अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे. मात्र या शौचालयात बसविण्यात आलेले चार स्टेनलेस स्टीलचे कमोड एकमेकांच्या जवळ असून, प्रत्येक युनिटसाठी स्वतंत्र दरवाजा किंवा पूर्ण पार्टिशनची स्पष्ट व्यवस्था दिसत नाही. पालिकेने उघड्यावर बसणा-या लहान मुलांसाठी ही व्यवस्था केल्याच सांगितले असलं तरी सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः लहान मुलांसाठी असलेल्या शौचालयात गोपनीयता ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. अशा सुविधांमध्ये सुरक्षितता, स्वच्छता आणि वैयक्तिक गोपनीयता या मूलभूत निकषांचे पालन होणं आवश्यक असल्याच मत व्यक्त केलं जातं आहे.
मिरा-भाईंदर शहरातील एक उड्डाणपूल चर्चेचाविषय (Flyover In Mira Bhayander)
दरम्यान, यापूर्वी मिरा-भाईंदर शहरातील एक नवीन उड्डाणपूल चर्चेचाविषयठरलाहोता. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेला एक नवीन उड्डाणपूल (Flyover) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. या पुलाच्या विचित्र रचनेमुळे नागरिक आणि नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करत असून, प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहरातील मिरा रोड ते भाईंदरला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पुलाची सुरुवात 4-लेन (4-Lane) च्या भव्य रुंदीने होते. मात्र, पुलाच्या मधोमध गेल्यावर हा रस्ता अचानक अरुंद होतो आणि दुसऱ्या टोकाला तो केवळ 2-लेनचा उरतो. (Flyover In Mira Bhayander)
सामान्यतः उड्डाणपूल हे वाहतूक वेगाने जाण्यासाठी बांधले जातात. मात्र, या पुलाच्या रचनेमुळे 'बॉटलनेक' (Bottleneck) परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 पदरी रस्त्यावरून वेगाने येणारी वाहने जेव्हा अचानक 2 पदरी अरुंद रस्त्यावर येतात, तेव्हा तिथे वाहनांच्या रांगा लागण्याची आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि 'सोशल मीडिया पेजेसनी यावर उपरोधिक टीका केली आहे. "हे कसले इंजिनिअरिंग?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काहींनी याला "नियोजनशून्य कारभार" म्हटले आहे, तर काहींनी या पुलाचा उल्लेख गमतीने 'Engineering Marvel' असा केला आहे.
