Nitesh Rane  :  राज्यात कुठेही हिंदीची सक्ती केलेली नाही. आम्ही पण सरकारमध्ये बसलेले आहोत. मराठी सक्तीची आहे. हिंदी नको तर संस्कृत घ्या असे मत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी व्यक्त केले. आम्ही पण मराठी आहोत आम्ही पण हिंदू आहोत हिंदू समाजाला तोडण्यासाठी हे सगळे कार्यक्रम कशाला हातात घेताय, हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी हे जे कार्यक्रम आखलेत त्याला बळी पडू नका असे मत राणे यांनी व्यक्त केले. 

एलईडी फिशिंग करणारी कुठलीही बोट त्यांच्या फॅक्टरीत परत सुखरूप जाणार नाही 

एलईडी फिशिंग करणारी कुठलीही बोट त्यांच्या फॅक्टरीत परत सुखरूप जाणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. गेल्या 6 महिन्यात आमच्या खात्याकडून या सगळ्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे.  मी हिंदू धर्म आणि हिंदुत्वासंदर्भात काम करणारा कार्यकर्ता आहे. मला देवाने ताकद द्यावी असेही राणे म्हणाले. नारायण राणे यांनी त्यांच्या कार्यकाळात मच्छीमार बांधवांसाठी  केलेलं काम आजही लोक विसरलेले नाहीत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आदर्श काम करत आहेत. पुढची 25, 50,100 वर्ष तेच मुख्यमंत्री राहतील असेही राणे म्हणाले. 

शेतकरी आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही

मला माझ्या मच्छीमार आणि कोळी बांधवांची चिंता आहे पण कोणाच्या घरातली भांडण मिटून जर ते एकत्र येणार असतील तर समाधानच आहे असे मत नितेश राणे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर व्यक्त केले. शेतकरी आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. स्वतःच्या मुलीला वाईनची फॅक्टरी उघडून देण्यासाठी येणाऱ्या द्राक्षापर्यंतचा संबंध संजय राऊतांचा आहे. गल्लीत बसून भांडुपच्या देवानंदने एवढे मोठे विषय करु नयेत असे राणे म्हणाले.  

हिंदू गब्बर म्हणून माझे कार्यकर्ते उत्साहाने बॅनर लावतात

काही लोकांची रात्रीची उतरत नाही त्यामुळे ते सकाळी उठून बॅनर लावतात असेही नितेश राणे म्हणाले. हिंदू गब्बर म्हणून माझे कार्यकर्ते उत्साहाने बॅनर लावत असतात. या हिंदू गब्बरची आता मातोश्रीने दखल घेतलेली आहे, ये डर जरुरी है असेही नितेश राणे म्हणाले. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्यामुळे मातोश्री परिसरात बॅनर लावले असतील असे राणे म्हणाले.  नशीब मातोश्रीच्या बाथरुममध्ये लावले नाहीत असेही ते म्हणाले.  

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील नितेश राणेंनी टीका केली. वडिलांचा हिंदू धर्मावरच द्वेष आहे, त्यांनी भाजपला शिकवू नये, हिंदू म्हणून एक राहणं आज गरजेच आहे. उद्या आपण हिंदू म्हणून भांडत राहिलो तर आपल्या घराच्या बाहेर येऊन भोंगे लावतील उद्या घरातल्या पुजा ही बंद होतील असे मत राणेंनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

Nitesh Rane on Uddhav Thackeray : राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे; नितेश राणेंचा हल्लाबोल