Manikrao Kokate : पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच नैतिकता दाखवून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खडसेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता ती गोष्ट वेगळी होती. पण अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असं घडलंय काय? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केलाय. मुळात काही घडलंच नाही तर मग राजीनामा मागता का? महाराष्ट्रात काही घडलंच नाही तर उगाच ध चा म का करता, असे म्हणत मामिकराव कोकाटे यांनी खडसेंवर टीका केली.
कुठलाही दोष नसताना अजित पवारांना टार्गेट केलं जातंय
पार्थ पवार यांच्यावर असलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे असं कोकाटे म्हणाले. चौकशी अंति या प्रकरणाचा अहवाल बाहेरील त्यावेळी त्यावर आम्ही बोलू असं कोकाटे म्हणाले. मात्र आताच्या परिस्थितीला कुठलाही दोष नसताना अजित पवारांना टार्गेट केलं जातंय हे बरोबर नाही. अजित पवार यांना कोण टार्गेट करता यावर मला भाष्य करायचं नाही मात्र कारण नसताना अजित पवारांवर जे वक्तव्य केले जात आहे ती योग्य नाही. अजित पवार यांनी कधीही चुकीच्या माणसाला पाठिंबा दिलेला नाही. काही केलं नाही तर मग तुम्ही पार्थ पवार व अजित पवार यांना बदनाम का करता? असा सवाल देखील कोकाटे यांनी केला.
काहीतरी बोलल्याशिवाय दानवेंना पक्षात जागा मिळणार नाही
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर देखील कोकाटेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राचे नेते जमीन घोटाळ्यात महाराष्ट्राला लुटत आहेत, असं वक्तव्य केले होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर कोकाटे म्हणाले की, अंबादास दानवे तेवढेच बोलू शकतात. कारण दानवे हे विरोधी पक्षाचे माजी आमदार आहेत, त्यांचा कार्यकाळ संपला, त्यामुळं त्यांना आता बोलणं अपरिहार्य आहे. काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना पक्षात जागा मिळणार नाही, असा टोला कोकाटेंनी दानवेंना लगावला. बोलल्यानंतरच त्यांना पक्ष बक्षीस देईल व ते बक्षीस मिळवण्यासाठी अंबादास दानवेंचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे कोकाटे म्हणाले.
वरिष्ठांची संमती घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्यासंदर्भात विचार करु
भाजप सोडून आम्ही सर्व पक्षांसोबत युती सर्व पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढवू असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले होते. यावर बोलताना कोकाटे म्हणाले की, अशा प्रकारचा प्रयोग करायला आमची हरकत नाही. मात्र त्यासाठी आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्याकडे निवडून येणारे उमेदवार असतील तो विचार आम्हाला वरिष्ठांच्या संमतीशिवाय करता येणार नाही. वरिष्ठांची संमती घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्यासंदर्भात विचार करु असे कोकाटे म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी बहुतांश नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार तयार
जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी सकारात्मक वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यात बहुतांश नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा फडकेल असा विश्वास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील एक दोन नगरपालिकांमध्ये युतीमध्ये लढण्याचे संकेत देखील माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. जळगाव महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट वरचढ ठरणार असल्याचे मत कोकाटेंनी व्यकत केले.
दोन ते तीन दिवसात युतीबाबत चित्र स्पष्ट होईल
जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र ही युती याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उमेदवारांच्या संख्येनुसार याबाबत निर्णय होईल असे कोकाटे म्हणाले. ज्या ठिकाणी उमेदवार संख्या जास्त त्या ठिकाणी काही प्रमाणात अडचण होणार आहे. युती करायची असेल तर मित्र पक्षांच्या उमेदवारांची यादी तपासावी लागेल. दोन ते तीन दिवसात युतीबाबत चित्र स्पष्ट होईल असे कोकाटे म्हणाले.
नाशिक मध्ये मनसे महाविकास आघाडी सोबतगेल्यास काही फरक पडणार नाही
नाशिकमध्ये मनसे महाविकास आघाडी सोबत युती केल्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही असे कोकाटे म्हणाले. नाशिक मध्ये मनसेचा एक काळ होता तो आता संपलेला आहे. जळगाव जिल्ह्यातही एकेकाळी आमचा राष्ट्रवादीचा होता, मात्र काळा बदलतो. काळाच्या ओघात आता मनसेचे नाशिक मध्ये काही आहे असं काही वाटत नाही. जळगाव जिल्ह्यात दोन ते तीन नगरपालिका सोडल्यास इतर सर्व नगरपालिकांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा फडकणार असल्याचे कोकाटे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नेते व माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती हे उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार व सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अरुण गुजराती हे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या: