Chandrashekhar Bawankule : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे ( Minister Dhananjay Munde) यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाला सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी बानकुळे यांना विचारले असता, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो, सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. दोघेही इमोशनल आहेत.दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील असेही बावनकुळे म्हणाले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्यात मतभेद आहेत,पण मनभेद नाहीत असं बावकुळे म्हणाले.
चार ते पाच दिवसांपूर्वी ही भेट झाल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच दिवसांपूर्वी ही भेट झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांची हत्याप्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड हे सध्या कोठडीत आहेत. सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं असताना, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. मात्र, आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.
हे सर्व सरप्राईजिंग, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली, दमानिया यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या भेटीबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना देखील प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व सरप्राईजिंग आहे. माझ्या माहितीनुसार भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली आहे. पण ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत दमानिया यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Suresh Dhas meets Dhananjay Munde : मोठी बातमी : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?