Men Suicide Stats : जगात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची नसून पुरुषांची आहे असं सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि एनआरसीबीची आकडेवारीवरून सर्वाधिक आत्महत्या या पुरुषांच्या असल्याचं समोर येतंय. जगात दर पाच मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करत असल्याचं आकडेवारी सांगतेय.
बंगळुरु येथील अतुल सुभाष या अभियंत्याने आत्महत्या केली आणि पुरुषांच्या आत्महत्येचा मुद्दा चर्चेत आला. अतुल हा बंगळुरू येथील एका कंपनीत आर्टिफिशिअर इंटेलिजन्स इंजिनिअर म्हणून काम करत होता. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अतुल सुभाष याने आत्महत्या करण्यापूर्वी सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता. यासोबतच त्याने 24 पानांची सुसाईड नोटही सोडली आहे.
अतुल सुभाषने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराच्या आणि मानसिक छळाच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. बंगळुरु पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया आणि त्याच्या सासरच्या लोकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करणारा अतुल हा पहिलाच माणूस नाही. प्रत्यक्षात अशी अनेक प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. पुरुषांच्या आत्महत्येबाबत डब्ल्यूएचओ आणि एनसीआरबीची आकडेवारी तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
दर पाच मिनिटाला एका पुरुषाची आत्महत्या
दरवर्षी जगात 7 लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. ब्रेस्ट कॅन्सर, एचआयव्ही आणि मलेरिया यांसारख्या आजारांमुळे मरणाऱ्यांची संख्येपेक्षा आत्महत्या करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, महिलांपेक्षा पुरुष जास्त आत्महत्या करतात. भारतातील NCRB च्या अहवालानुसार, आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक 100 लोकांपैकी 70 पुरुष आहेत.
NCRB च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये भारतात 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या, ज्यापैकी 1,18,989 म्हणजेच 73 टक्के पुरुष होते. तर त्यात फक्त 4,50,26 महिला होत्या. या आकडेवारीनुसार दर 5 मिनिटाला एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचं दिसतंय.
तरुण पुरुषांच्या आत्महत्येमध्ये वाढ
NCRB च्या आकडेवारीनुसार, भारतातील बहुतेक आत्महत्या प्रकरणांमध्ये 30 ते 45 वयोगटातील लोकांचा समावेश आहे. यानंतर 18 ते 30 वयोगटातील लोकांचा समावेश आहे. तथापि, 45 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा आकडा कमी होता.
सन 2021 च्या आकडेवारीनुसार, 30 ते 45 वयोगटातील 5,20,54 लोकांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी 78 टक्के पुरुष होते. तर 18 ते 30 वयोगटातील 5,65,43 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यामध्ये 67 टक्के पुरुष होते. तर 45 ते 60 वयोगटातील 3,01,63 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यामध्ये 81 टक्के पुरुषांचा समावेश होता. 1,09,749 विवाहितांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी 74 टक्के पुरुष होते.
ही बातमी वाचा;