Mayor Ritu Tawde : महापौर पदाचा पदभार स्वीकारण्याआधीच आपण अनधिकृत बांगलादेशी विरोधात मोहीम हाती घेणार असल्याचं रितू तावडे यांनी सांगितलं होतं. आज महापौर रितू तावडे या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशी विरोधात मोहीम हाती घेणार आहेत. आज मुंबई महापालिका मुख्यालयात याच विषयावर बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या हे मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशी विरोधात मोहीम चालवत आहेत. त्यासोबतच जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत आज महापौरांसोबत बैठकीत ते सुद्धा सहभागी होणार आहेत.
मुंबईला सेफ ठेवायचं असेल तर आपल्याला बांगलादेशींना इथून बाहेर काढावं लागेल
महापौर रितू तावडे यांच्यासोबत अतिरिक्त महापालिका आयुक्त मुंबई शहराचे जिल्हाधिकारी पोलीस सह आयुक्त हे सुद्धा उपस्थित राहणार असून या सगळ्या विषयात सखोल चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीनं बहुमताचा आकडा पार केल्यानं भाजपने तब्बल 25 वर्षांची एकहाती सत्ता असणाऱ्या शिवसेनेला दूर करत आपला महापौर बसवण्याची संधी मिळाली. त्यानुसार भाजपनं मराठी महापौर म्हणून रितू तावडे यांना यासाठी संधी दिली आहे. पण त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसह इतर कुठल्याच पक्षानं उमेदवार दिला नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मला इथं प्रत्येक मुंबईकरासाठी काम करायचं आहे. जर मुंबईकरांची इच्छा आहे की त्यांना चालायला फुटपाथ नाही तर त्यांच्या मनात यावरुन रोष आहे. मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहेत, शिक्षित आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना असं वाटतंय की, आम्हाला रस्त्यावरुन चालायचय पण आम्हाला रस्ताच उपलब्ध नाही. मग या रस्त्यांवर कोणी अतिक्रमणं केली आहेत, तर बांगलादेशी रोहिंग्यांना. त्यामुळं जर मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे.
मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे चारही बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या दाखल होऊन मुंबईच्या मालाड पठाणवाडी परिसरात काम शोधण्यासाठी आले होते. मालाड कुरार पोलिसांच्या ATC पथकाला त्यांच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक काम शोधण्यासाठी येत असल्याचं गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुशंगाने कुरार पोलिसांच्या एटीसी पथकाने मालाड पठाणवाडी परिसरात धाडी टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नाव तुहीनुर जायनल सरदार वय 30 वर्षे, मोहम्मद अब्दुल मोमीन लतीफ सरदार वय 52 वर्षे, नजरुल इस्लाम स्वर अली बिश्वास वय 41 वर्षे, मोहम्मद इमामुल हक्क रहेमान वय 46 वर्षे असून हे सर्व आरोपी बांगलादेश मध्ये राहणारे आहेत. कुरार पोलिसांनी या आरोपीकडून बांगलादेशी नागरिक असल्याचा मोठा प्रमाणात पुरावा सुद्धा जप्त केली आहे.