Bachchu Kadu on Ajit Pawar: आज सर्वच शेतकरी फळबाग उत्पादक असू द्या, कांदा उत्पादक असू द्या, सोयाबीन कपास उत्पादक असू द्या, शेतकऱ्यांकडे अनेक भागात काहीच शिल्लक राहिलेलं नाही, मग शेतकऱ्यांना अशावेळी कर्जमाफी करणार नाही, तरे केव्हा करणार? अशी विचारणा प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Bachchu Kadu Fadnavis loan waiver) केली. दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी देऊ असे म्हणत होते, आता देवा भाऊचे देवाने ऐकले, आता दुष्काळ पडला. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी द्यावी, अनेक अडचणी शेतकऱ्यांकडे आहेत, याबाबत कधी निर्णय घेणार? तातडीने बैठक घेऊन सूचना द्या, अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आम्ही गोट्या खेळतोय का? या वक्तव्याचा सुद्धा बच्चू कडू यांनी (Bachchu Kadu on Ajit Pawar) समाचार घेत सडकून प्रहार केला. 

Continues below advertisement

 

पण मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही

बच्चू कडू म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात पूर्णतः संत्रा खाली पडला आहे. केळी दोनशे रुपये क्विंटन एवढ्या खाली म्हणजे ते तोडले, पण परवडत नाही अशा वाईट परिस्थितीमध्ये आहे. आता ओला दुष्काळ जाहीर करणे अपेक्षित होतं, पण मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही. दुष्काळ जेव्हा जाहीर होतो तेव्हा सक्तीची कर्ज वसुली थांबते. त्यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही, असे ते म्हणाले. सरकार देऊन देऊन 10 हजर देईल, एकरी लागवड खर्च 40 हजार झाला आहे, या मदतीमध्ये शेतकरी काय  करणार? स्वातंत्र्यपासून शेती तोट्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तूर उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, जिल्ह्याजिल्ह्यामध्ये जा शेतकऱ्यांना आधार द्यावा, पण देवा भाऊ तयार नसल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

गोट्या खेळून दोन वेळा शपथविधी घेतला

बच्चू कडू यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा सुद्धा जोरदार समाचार घेत प्रहार केला. ते म्हणाले की, तुम्ही गोट्या खेळून दोन वेळा शपथविधी घेतला, पैसे नाही, तर लाडक्या बहिणीला का बदनाम करता? शक्तीपीठ कोणी मागितला, कोणाचा आग्रह आहे, दोन तीन वर्ष पुढे ढकलून द्या, मुंबईत स्मार्ट सिटीत पैसा गुंतवला, शेतकरी अडचणीत आल्यावर काय करणार? पगार कपात करा, पंजाबप्रमाणे दबाव करा, दादाची दादागिरी सत्तेत राहण्यासाठी असल्याची तोफ बच्चू कडू यांनी डागली. आमदारांनी दिले तरी 90 कोटी होतील, सर्वांना झळ पोहचली पाहिजे. गडचिरोलीत (Gadchiroli farmer crop damage) 31 हत्तीने नुकसान केलं, 20 शेतकरी वाघाच्या हल्ल्यात मरले, शेतकऱ्याचे जीवन कुत्र्या मांजरासारखं झालं असून जगलं, मेलं तरी काही देणं घेणं नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीत लक्ष नाही, त्या जिल्ह्यात नुकसान झाल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या