Marathi Bhasha Gaurav Din wishes 2025 : कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलं. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शिवाय महाराष्ट्राच्या मायबोलीला साहित्यात विशेष स्थान निर्माण करुन देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून सरकारने त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने तुम्ही सुद्धा तुमच्या प्रियजनांना मराठी शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
मराठी भाषा गौरव दिनाच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा शब्द माझे विचार, माझा श्वास माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी!मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीनमराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी भाषा, मराठी मन,अभिमान महाराष्ट्राचा,स्वाभिमान मराठीचा...!मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भाषेचा गोडवा साखरेहूनही फार,मऊ मखमली असली तरीशब्दांना तिच्या धार,वळवावी तशी वळतेसहज सगळ्यांना कळतेभाषेची आमच्या श्रीमंती अपरंपारमराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळामराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळमराठी भाषा आहेच अशी रसाळमराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीलामराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी म्हणजे गोडवा,मराठी म्हणजे प्रेम,मराठी म्हणजे संस्कार,मराठी म्हणजे आपुलकी,मराठी म्हणजे महाराष्ट्र,मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगत राहावी, शिकत राहावीसमजत राहावी, हसत राहावी अशी ही मायाशब्दांच्याही पलीकडल्या भावनांनाअखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी मायामराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माय मराठी, साद मराठीभाषांचा भावार्थ मराठी,बात मराठी, साथ मराठीजगण्याला या अर्थ मराठीमराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा स्वाभिमानसर्व भाषांची राजभाषा असे मराठीभाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटीधर्म मराठी, कर्म मराठी,मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा...मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
रुजवू मराठी, फुलवू मराठीचला बोलू फक्त मराठीमराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जात मराठी, धर्म मराठीशान मराठी, अभिमान मराठी!मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे ही वाचा :
