Maratha Reservation Special Assembly session : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून, राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) विधानभवनात पोहचले आहेत. तर, राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल विधानभवनात येताच सुरुवातीला त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपाल हे सेंट्रल हॉलमध्ये पोहचले. यावेळी राष्ट्रगीत झाले. त्यानंतर आता राज्यपाल यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलतांना राज्यपाल म्हणाले की, "महाराष्ट्र सरकार सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी काम करत आहे. 2028 पर्यंत देश 5 ट्रिलीयन डॉलर आणि राज्य 1 ट्रिलियन डांलरची अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. 65 हजार करोड विदेशी गुंतवणूक करत आहे. राज्याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 1 लाख रोजगार निर्मित करण्याचा प्रयत्न करत आहेत."


समृद्धी महामार्गाचा विस्तार


पाच वर्षांत 5 लाख नोकरी निर्मीत केली जाईल. 2025 च्या आधी सेवेत असलेल्या सरकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार सरकार करत आहे. 5 हजार 700 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना सुरू केली असल्याचे राज्यपाल म्हणाले.


कॅबिनेटची बैठक


विशेष म्हणजे अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी कॅबिनेटची बैठक झाली असून,या बैठकीत राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.