मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मंचर एसटी आगाराचा (Manchar ST Bus Stand) उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. मंटर एसटी आगाराचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते 11 नोव्हेंबरला होणार होते. परंतु नुकतीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंचर इथल्या एसटी आगाराच्या उद्घाटन सोहळ्याला आले तर आम्ही काळे झेंडे दाखवू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Reservation) वतीने देण्यात आला. त्यानंतर 11 नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंचर इथल्या एसटी आगाराच्या उद्घाटन सोहळ्याला आले तर आम्ही काळे झेंडे दाखवू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्तेच्या जोरावर कार्यक्रम घेऊन मराठा समाजाच्या भावना दुखवू नये अशा पद्धतीचा देखील इशारा देण्यात आला होता. 11 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होणार होता माञ आता हा
कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.
मंचरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आल्यास मराठा क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखवणार
मंचर एसटी आगाराचे उद्घाटन होत आहे. याचा आनंदच आहे... पण जोपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि खासदार यांनी तालुक्यात प्रवेश करू नये ही नम्र विनंती आहे. कारण मराठा आंदोलनाच्या वेळी तालुक्यात एका ही नेत्याने लक्ष दिले नाही. एसटी आगाराचे उद्घाटन एखाद्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते घ्यावे करावे. जर नेते आले तर मराठा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाला येणाऱ्या मान्यवरांचा काळे झेंडे दाखवून अपमान केला जाईल. सत्तेच्या जोरावर कार्यक्रम घेऊन... मराठा समाजाच्या भावना दुखवू नये ही विनंती आहे . एक मराठा....लाख मराठा.
राजकीय नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही
राज्यातले अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. तरीही मराठा समाजाची परिस्थिती नीट नाही. त्यांना मूलभूत गोष्टींसाठी भांडावं लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी येऊ नये, असा आक्रमक पावित्रा मराठ्यांनी घेतला. मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. राजकारण्यांना मतदानासाठी फक्त मराठा समाज दिसतो. त्यावेळी सगळे नेते मतदान मागण्यासाठी येत असतात. मात्र आता आरक्षण द्यायच्या वेळी सरकार कोणतीही ठाम भूमिका घेत नाही आहे. त्यासोबत कोणताही राजकीय पक्ष ठाम भूमिका घेत नाही. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळायला हवं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही अशी भूमीका मराठा समाजाने घेतली आहे.
हे ही वाचा :