Vijay Waddetiwar : आज महाराष्ट्रातील ओबीसी (OBC) नेत्यांची बैठक झाली. यामध्ये विविध पक्षात आणि सामाजिक संघटनामध्ये काम करणारे नेते होते. अलीकडे घेतलेला निर्णय आणि काढलेला जीआर यामुळं ओबीसीचा फायदा की तोटा यावर चर्चा झाल्याचे त काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Waddetiwar) यांनी व्यक्त केले. शासनाने काढलेल्या जीआरमध्ये सरसकट त्यानंतर पात्र असे शब्द होते. जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याला विरोध नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. जीआर काढताना सरकारची बुद्धी आणि डोकं ठिकाणावर नव्हतं एवढं नक्की अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

Continues below advertisement


अनेक तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली आम्ही न्यायालयीन लढाई लढू. सरकार म्हणत असेल की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. पण सर्व काढून घ्यायचं आणि नंतर धक्का लावायचा नाही असं म्हणायचं. आम्ही याविरोधात रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढणार आहोत. पक्षाचे पादत्राने बाहेर ठेवून लढाई लढायची आहे, तसे आम्ही लढणार आहोत असे वडेट्टीवार म्हणाले. 


काही ओबीसी नेते सत्ताधाऱ्यांचं मांडलिकत्व करतायेत


मराठवाडा मुंबई कोकण आणि इतर ठिकाणी बैठका घेणार आहोत. तसेच जिल्हास्तरावर नेमणूका करायच्या त्यानुसार सुरुवातीला जिल्हानिहाय आंदोलन करणार आहोत, त्यानंतर विभागनिहाय आंदोलन करायच ठरलं आहे. याबद्दल नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. काही ओबीसी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांचं मांडलिकत्व करत असतील त्याचा आम्ही बैठकीत निषेध केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पहिला जीआर काढला दुसरा काढला नसता तर आमच्यावर ही वेळ आली नसती, उपस्थित आहेत त्यांचा पाठिंबा आहेच पण उपस्थित नाहीत त्यांनी पाठिंबा द्यावा असे वडेट्टीवार म्हणाले. 


गावागावात जाऊन आम्ही जनजागृती करणार


सरकार म्हणून जी भूमिका घेतलीय त्यावर आम्ही न्यायालयात जाणार आहोत असे वडेट्टीवार म्हणाले. गावागावात जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत. याच आठवड्यात आम्ही जाणार आहोत. छगन भुजबळ यांची लढाई आमच्यापेक्षा वेगळी आहे असं नाही. ते कोर्टात जातायत आम्ही देखील कोर्टात जाऊ. भुजबळ साहेब यांच्याशी अजून बोलणं झालेलं नाही ते बोलण लवकरच करु असे वडेट्टीवार म्हणाले. बैठकीत एकत्र आलो नाही म्हणजे लढ्यात एकत्र येणार नाही असं होणार नाही. ओबीसी समाजाच्या हितासाठी आम्ही सर्व लढतोय. 354 जाती आहेत त्यांना एकत्र आणण्यात थोडा वेळ जाईल पण सर्व एकत्र येतीलच असे वडेट्टीवार म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र सापडली त्यांना आमचा विरोध नाही पण सरसकटला आमचा कायम विरोध असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 


अनेक मराठा अभ्यासक आणि नेत्यांनी या जीआरवर भूमिका मांडली आहे. स्वतः राणे साहेबांनी देखील भूमिका मांडली आहे. अनेक मराठा नेत्यांची वेगळी भूमिका असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सरकार म्हटलं होत की आम्ही जे टिकेल ते देऊ पण त्याच काय झालं? असासवाल वडेट्टीवार यांनी केला. एकीकडे सरकारच लक्ष इतर प्रश्नाकडं नाही आणि समाजात भांडण मात्र लावून दिली जात आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Manoj Jarange On Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...