Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिल्यावर 14 ऑक्टोबरला 30 दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे, 14 ऑक्टोबरला जालना येथील अंतरवाली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) आजपासून राज्याचा दौरा करत आहे. संपूर्ण मराठवड्यासह, नगर, नाशिक, सोलापूर, बुलढाणा यवतमाळ आदी जिल्ह्यांचा जरांगे दौरा करणार आहे. आजपासून 11 ऑक्टोबर दरम्यान हा दौरा असणार आहे. या 12 ‎दिवसांच्या दौऱ्यात 13 ‎जिल्ह्यांतील 87 गावांमध्ये जाऊन‎ जरांगे पाटील मराठा संवाद साधतील. विशेष म्हणजे यासाठी 5 हजार किमीहून‎ अधिक प्रवास ते करणार आहेत. तसेच या दौऱ्यात जरांगे यांच्यासोबत कायम 200 कार्यकर्ते आणि 25 वाहनांचा ताफा असणार आहे. 


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, 14 ऑक्टोबरला 30 दिवस पूर्ण होणार आहे. दरम्यान, 14 ऑक्टोबरला जरांगे जालना येथील अंतरवालीसराटी गावात जाहीर सभा घेणार आहे. त्यापूर्वी मराठा समाजाला शांततेच आवाहन करण्यासाठी जरांगे आजपासून राज्याचा दौरा करणार आहे. आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत 13 जिल्ह्यांचा जरांगे दौरा करणार आहेत. ज्यात संपूर्ण मराठवाड्यासह, नाशिक, नगर, सोलापूर, यवतमाळ, बुलढाणा, जिल्ह्याचा जरांगे दौरा करणार आहे. या काळात जरांगे मराठा समाजाच्या गाठीभेटी घेऊन आरक्षण विषयक आपली भूमिका मांडून, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. याचवेळी ते समाजातील आरक्षण विषयक समाजातील लोकांचे म्हणणे देखील ऐकून घेतील. सोबतच 14 तारखेला अंतरवाली गावात होणाऱ्या जाहीर सभेला येण्यासाठी आवाहन देखील करणार आहे. 


हिंगोलीत आज सभा होणार...


मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस उपोषण केले होते. त्यानंतर सरकारका 40 दिवसांची मुदत दिल्यावर त्यांनी आपले उपोषण मागे घेतलं. त्यापूर्वी जरांगे यांची 14 ऑक्टोबरला अंतरवालीत सभा होणार आहे. त्यामुळे पुढील दिशा काय असणार आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील हे आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी जरांगे हिंगोली जिल्ह्यात असणार आहे. यावेळी त्यांची सभा देखील होणार आहे. शहरातील अकोला बायपासवरील मधुरदिप सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाभरातील मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे हिंगोली दौऱ्यात जरांगे यांच्याकडून तालुका व गावामध्ये जाऊन मराठा आरक्षण संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : गाढवांच्या गळ्यात निषेधाचा फलक अन् गावभर घंटानाद, नांदेडमध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी अनोखं आंदोलन