Ajit Pawar : शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आंदोलनाची वेळ कोणावरही येऊ नये असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्म करत असल्याचे अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत काळजी करु नका, सरकार सकारात्मक असल्याचे अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सर्वांना न्याय मिळाला पाहिजे

दरम्यान, न्यायालयाने दिलेले आदेश सर्वांनाच पाळावे लागतात असे अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत कसा मार्ग काढायचा याचा प्रयत्न चालला आहे. आम्ही त्याच्यातून मार्ग काढू असे अजित पवार म्हणाले. सरकार सकारात्मक आहे. जेवढे समाज आहेत, त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे असे अजित पवार म्हणाले. राजयकीय पक्षाचे काहीजण आंदोलनात सहभागी झाले आहेत. तो प्रत्येकाला अधिकार असल्याचे अजित पवार म्हणाले. आजपर्यंत आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. कायद्याच्या चौकटीत मार्ग निघेल. राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे असे अजित पवार म्हणाले. 

हाकेच्या आरोपीला काही किंमत देत नाही

लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपांबाबत देखील अजित पवारांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, हाकेच्या आरोपीला काही किंमत देत नाही. कोणाच्या आरोपीला किंमत द्यावी याला महत्व आहे असा टोला अजित पवार यांनी हाकेंना लगावला. 

मुंबईतील आझाद मैदानात आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.  मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे युवक या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली आहे. आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange: मुदत संपली, लगेच मुदतवाढ मिळाली; मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन सुरूच राहणार, उद्याही गर्दी होणार