Mantralay Security मुंबई: संपूर्ण राज्याचा राज्यकारभार चालणाऱ्या मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्याचासंभाव्यधोकालक्ष्यातघेता, आता मंत्रालयाला पोलिसांच्या 'एलिट गार्ड' (Elite Guard)या अत्यंत घातक कमांडोचे संरक्षक कवच देण्यात आले आहे. डोळ्याला काळा गॉगल, हातामध्ये एके-47 आणि उजव्या हाताचे एक बोट बंदुकीच्या 'ट्रिगर'वर अशा सदैव सज्जतेमध्ये हे कमांडो सध्या मंत्रालयातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. (Mantralay Security Elite Guard) 

Continues below advertisement

मुंबईसह महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांना सध्या मोठा धोका आहे. मंत्रालयाला तर सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येतंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आता तर मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर प्रत्येकी एक-एक एलिट गार्डमधील प्रशिक्षित कमांडो तैनात केला आहे. त्याच्या हातात एके-47 सारखे अत्याधुनिक शस्त्र दिलेले आहे. यांची नजर फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या हालचालींवर असते. तिहेरी सुरक्षा कवच मंत्रालयाला तिहेरी सुरक्षा कवच आहे.

'एलिट गार्ड' म्हणजे कोण? (Mantralay Security Elite Guard) 

Continues below advertisement

एलिट गार्ड किंवा एलिट पोलीस फोर्स ही पोलीस दलातील विशेष पोलिसांची प्रशिक्षित तुकडी असते. या तुकडीतील कमांडोंचा वापर दहशतवादी कारवायांच्या विरोधात आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि अत्यंत गोपनीय आणि उच्च दर्जाच्या मोहिमांमध्ये वापर केला जातो. दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचे विशेष प्रशिक्षण या तुकडीला दिले गेलेले असते. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात एलिट पोलीस फोर्स हे आता कायमस्वरूपी तैनात करण्यात आले आहे.

ATS : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे उत्तरप्रदेशमध्ये छापेमारी

दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे उत्तरप्रदेशमध्ये छापेमारी केल्याचीमाहितीसमोरआलीआहे. वाराणसीतील आदमपूर पोलीस ठाणे हद्दीतील पठाणी टोला भागात ATS नेहि छापेमारी केलीआहे. या कारवाईत डॉ. आरिफ अन्सारी आणि त्यांचा मुलगा अबू बक्र हे या प्रकरणात सहभागी असल्याचा ATS ला संशय आहे. ATS पथकांने त्यांच्या घराची सखोल झडती घेत, घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काही महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणात संशयास्पद आर्थिक व्यवहार, परदेशातून येणारा निधी किंवा हवालाच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होतअसून यांचा तपास ATS कडून केला जात आहे. तर संशयितांचे बँक व्यवहार, डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि संपर्क व्यक्ती यांची खात्री ATS कडून केली जात आहे. तसेच त्यांचा कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र आणि वाराणसी ATS कडून ही संयुक्त कारवाई करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या