Manoj Jarange Reply To Chhagan Bhujbal : तुम्ही तर आमचा जीव वाचवायला आला नाही, पण जे न्यायमूर्ती जीव वाचवायला आले त्यांच्याबद्दल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आता खालच्या पातळीवर बोलायला सुरूवात केलीय असं प्रत्युत्तर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिलं. मराठा समाज (Maratha Reservation) जास्त काही मागत नाही, आपल्या हक्काचं बोलतोय असंही ते म्हणाले. मनोज जरांगेंची भेट घेणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर भुजबळांनी टीका केली होती, त्याला जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हिंसाचाराचं (Beed Violence) आम्ही समर्थन करत नाही, मराठा आंदोलनाला गालबोट लागण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. मराठ्यांना कुणबी आरक्षण दिल्यानं ओबीसींचे आरक्षण कसं संपणार असा प्रश्न मनोज जरांगे यांनी केला. जे मराठा समाजाच्या हक्काचे आहे तेच आम्ही मागत आहोत असंही ते म्हणाले.
जीव वाचवणारे आले, तुम्ही तर जीव घ्यायला निघाला (Manoj Jarange Reply To Chhagan Bhujbal)
माजी न्यायमूर्तींनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. त्यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत असल्या माणसांकडून न्याय कसा मिळणार असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "माणसाने भानावर राहून बोललं पाहिजे. आता तर ते खूपच खालचं बोलायला लागलेत. न्यायदानाचं काम हे न्यायाधीश करतात. त्यांनी जीव वाचवण्याचं काम केलं. जीव वाचवण्यासाठी तुम्ही तर येत नाही, तुम्ही तर जीव घ्यायला निघाला. पण जे आलेत त्यांच्यावर असे बोलत असाल तर काय बोलणार? रामराम तर कुणीही कुणाला घालतो, नमस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. त्यांनी आपल्याला रामराम केला यात काय बिघडलं?"
उपोषण करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या म्हणालो, हिंसा करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यायची विनंती केली असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. आमरण उपोषण जरी स्थगित केलं असलं तरीही साखळी उपोषण सुरू आहे, पण साखळी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत असं मनोज जरांगे म्हणाले.
होऊ द्या चौकशी
जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यावर भुजबळांनी पोलिसांची बाजू घेऊन आपल्यावर टीका केली. मी तर म्हणतोय की याची सखोल चौकशी करा. तुम्ही जे बोलताय ते खरं असेल तर तुमच्या सरकारकडून चौकशी करा. जे या प्रकरणात बडतर्फ व्हायला पाहिजे होते ते बाजूलाच राहिलेत आणि कारवाई दुसऱ्या पोलिसांवरच केली.
ही बातमी वाचा: