Manoj Jarange : आमरण उपोषणामुळं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तब्बेत प्रचंड खालावली आहे. सार्थकांच्या आग्रहानंतर अखेर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. गेल्या नऊ दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) आमरण उपोषण सुरू आहे.
मनोज जरांगे यांची तब्बेत खालावत चालली आहे. तब्येत खालवत असतानाच आज मनोज जरांगे यांना मध्यरात्री सहकाऱ्यांच्या आग्रहाने सलाईन लावण्यात आले आहे. आंदोलन स्थळी गावकऱ्यांनी आंदोलकांनी उपचार घेण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर रात्री 12 वाजता डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले.
मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्यांदा उपोषण सुरु
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ते नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिक ठिकाणी बंद
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात येत आहे. तसेच परभणी, सोलापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. आज देखील विविध मराठा संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. तसेच नांदेड शहर आणि नायगाव मध्ये देखील बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे ओबीसीकडून धनगर आणि बंजारा समाजाचे देखील ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.