Manoj Jarange Patil : मुंबईत माझ्याविरोधात स्टिंग ऑपरेशनचा कट रचला जातोय, एका महिलेचा समावेश; मनोज जरांगेंचा स्फोटक आरोप
Manoj Jarange Patil : माझ्या विरोधात कट रचला जातोय, कारण तर मी गरिबांसाठी काम करतोय. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे. असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil : माझ्या विरोधात कट रचला जातोय, कारण तर मी गरिबांसाठी काम करतोय. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे. असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. हिंगोलीच्या (Hingoli) कामठा फाटा येथे आयोजित शिवजयंतीच्या (Shivaji Jayanti 2026) कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हा आरोप केला आहे. मात्र आपणही काही कमी नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता असा इशाराही दिला आहे. मात्र मनोज जरांगे यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली असून त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
येत्या चार ते पाच दिवसामध्ये फार मोठा कट हा मुंबई येथे रचला जातोय, त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. तेथे तर स्टिंग ऑपरेशन सुरू आहे. मात्र आपण ही काही कमी नाही, आपली देखील यंत्रणा कामाला लागली आहे. कट का रचला जातोय? तर मी फक्त गरिबांच्या लेकरसाठी काम करतोय म्हणून. मात्र आपल्यावर काही फरक पडत नसल्याचे सांगत मनोज जरांगे यांनीही इशारा दिला आहे. हिंगोलीच्या कामठा फाटा येथे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा परभणीत सरकारला इशारा
परभणीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बाधित शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. याच शेतकऱ्यांची मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच भेट दिली आणि आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. आपलं म्हणणं सरकार दरबारी मांडलं पाहिजे, असेही मनोज जरांगे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली आणि शेतकऱ्यांची महसूलमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना जर शक्तिपीठ महामार्गाला जमिनी द्यायच्या नसतील तर सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Manoj Jarange Patil Ajit Pawar plane crash : पवार कुटुंबीयांचं म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मनोज जरंगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, जर पवार कुटुंबीयांचं म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सध्या काम करताना जशी माहिती दिली जात आहेत, त्याप्रमाणे आता सर्वांनाच वाटत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, परिवाराचे म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे. असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























