Manoj Jarange Patil on Raosaheb Danve : माझ्या नादी लागू नका, मी बिघडलो तर पुरा सुफडा साफ करुन टाकेल, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्हाला होऊ देणार नाही असं म्हणज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर हल्लाबोल केला. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करतायेत. मी पाडा म्हंटल असत तर लोकसभेला दानवे 3 लाख मतांनी पडले असते असेही जरांगे पाटील म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती. मार्चमध्ये एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा केस केली होती. केस करून काय होईल. तुमचा पोरगा उभा राहील ना त्यावेळी कचका दाखवतो, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी दानवेंना इशारा दिला आहे. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
शेतकऱ्याची पोर बुक्कीत दात पाडतील
रावसाहेब दादा तुम्ही असे वागायला नाही पाहिजे. आमच्या वाट्याला जाऊ नका, तुम्हाला जेरीस अणायला वेळ लागणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. तुमच्याकडे गुंड असतील, पण आमच्या शेतकऱ्याची पोर बुक्कीत दात पाडतील असंही जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना ओरबडून नेलं
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना ओरबडून नेलं, त्या तावडेंनी घोटाळा केला त्यांना दिल्लीला हुसकावून लावलं. तसेच नितीन गडकरी यांनाही हुसकावून लावल्याचे जरांगे पाटील म्हणाले. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाढवली, त्यांच कुटुंब संपवलं असेही जरांगे म्हणाले. फडणवीस एकाही मंत्र्याला मोठं होऊ देत नाहीत असंही जरांगे म्हणाले. आज दीड कोटी मराठा समाज आरक्षणात गेला असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका लय विचित्र प्राणी
देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस लय विचित्र प्राणी आहे. फडणवीस हे शेतकरी, गोरगरीबाला मारणारा प्राणी आहे.गावच्या गाव कुणबी नोंदी सापडल्या. आहेत. हे आंदोलन 100 टक्के यशस्वी झाल्याचे जरांगे म्हणाले. आपल्याला सरकारने दिलेलं आरक्षण मान्य नाही.देवेंद्र फडणवीस यांनी आपला तिहेरी तोटा केला आहे. दिवस बदलत असतात देवेंद्र फडणवीस, तुमचे दिवस बदलले का नाही मराठा समाजामुळं?जनतेवर अन्याय केल्यावर जनता ठेवत नसते असेही जरांगे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : एकजूट कायम ठेवली तर सत्ताही मिळेल, कधी न पडणाराही पडेल, गनिमी कावा कळू देणार नाही: मनोज जरांगे