पोलीस संरक्षण काढण्यात यावं, मनोज जरांगेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र, धनंजय मुंडेंच घातपाताच्या कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप
स्वतःचे पोलीस संरक्षण नाकारत, आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी कला आहे. स्वतःचे पोलीस संरक्षण नाकारत, आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. आज जालन्यात पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे मनोज जरंगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्जाद्वारे ही विनंती केली आहे.
घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडेच, जरांगेंचा आरोप
या अर्जामध्ये आपल्या घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडेच असल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तसेच पोलीस संरक्षण तत्काळ काढण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांत ही हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं. धनंजय मुंडे यांनी हा कट रचल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार केली होती. जरांगे यांनीही पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. या तक्रारीनुसार पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले होते. त्यातील एक संशयित हा जरांगे पाटील यांचा जुनाच सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. कट शिजला गेला. यासंदर्भात पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष घालून आहेत. तपासात दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे जरांगे पाटील म्हणाले होते. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले होते.
मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा धनंजय मुंडेंची मागणी
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली.
महत्वाच्या बातम्या:






















