Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी निर्णायक लढ्यासाठी रणशिंग फुंकलं आहे. 29 ऑगस्ट रोजी कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांनी आज (25 ऑगस्ट) आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांना सर्व कामधंदे बाजूला ठेवून त्यांनी मुंबईमध्ये येण्याचे आवाहन केलं आहे. ज्या मार्गाने मदत होईल, त्या मार्गाने आंदोलनाला मदत करावी असे आवाहन सुद्धा पाटील यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागणी मान्य केल्यास आम्हाला मुंबईला येण्याची गरज नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.
मी सरकार सुद्धा उलथवून टाकू शकतो
कायद्यात बसणारे आरक्षण आम्हाला हवं आहे. न बसणाऱ्या 29 जाती फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणात घालून त्यांनी खुन्नस दाखवली आहे. आजचा दिवस प्रेमानं सांगण्याचा असून आरक्षण दिल्यास मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नाही दिले ते मी सरकार सुद्धा उलथवून टाकू शकतो, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला. आंतरवाली सराटीत आल्यावर मी कोणा मंत्र्याचे ऐकणार नाही. चार महिन्यांपूर्वीच आंदोलनासाठी तारीख दिली असल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी आपण स्वतः फडणवीस यांना फोन केला होता आणि आंतरवाली सराटी देण्याचा आवाहन केलं होतं, असेही जरांगे पाटील म्हणाले.
तर मग आडमुठे कोण?
दरम्यान, मुंबईत आंदोलनाचा निर्धार कायम ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही पद्धतीने ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी कोणताही एका मार्गाने आझाद मैदानात जाण्यासाठी मार्ग देण्याची विनंती केली. शिंदे समितीचा दाखला देत म्हणून जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. सरकारकडूनच नेमण्यात आलेल्या शिंदे समितीकडून 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या. समिती सुद्धा तुमचीच होती. समितीचा अहवाल सुद्धा स्वीकारण्यात आला, तर मग आडमुठे कोण? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
कुणबी आणि मराठा एकच आहे
ते म्हणाले की, कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा अशी त्यांनी मागणी केली. गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यास सुरू असल्याचा टोला जरांगे यांनी लगावला. ते म्हणाले की आम्हाला सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावं. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे. आमची ही आमची जमीन आहे हे आम्हाला भक्कम माहीत असल्याचं ते म्हणाले.
10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं
सरकारकडून देण्यात आलेलं 10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं. आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या, भाड्याने घर देऊ नका अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले की दीडशे वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, पण सग्यासोयऱ्यांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा अजूनही संयमी आहे, त्याची व्याख्या देण्यात आली आहे. ज्यांची कुणबी नोंद आहे त्या सगेसोयरे दाखले द्या, आता आंदोलन खूप पुढे गेला असून राज्य अस्थिर करू नका असा आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. मराठ्यांची कुणबी पोट जात होत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या