Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजणगावमध्ये खेलोबामध्ये (Anjangaon Statue Controversy) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी 8 ते 10 तास रस्ता रोको केल्यामुळे आणि दगडफेक झाल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ग्रामस्थांनी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुतळा हटवण्यास तीव्र विरोध केला होता.  आत निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची (Kheloba Temple) असल्याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झाले आहे. त्यामुळे आता या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधणार आहेत. आता या प्रकरणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.   

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छत्रपतींचा सन्मान करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. छत्रपतींनी आपल्या सर्व समाजाला एकत्र ठेवले आहे. त्याच विचारांना आपल्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. वाद मिटला ही खूप आनंदाची गोष्ट झाली. रात्री सोलापूरच्या एसपींनी सांगितलं होतं की, हा वाद मिटवणार आहेत. म्हणून मला जाण्याचा दौरा टाकता आला नाही. त्याच्या माग कोण होतं, काय होतं हे पोलीस प्रशासनाने शोधून काढलं पाहिजे. पण खूप चांगलं झालं की हा वाद मिटला. 

Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: पुतळा विकणारा कोण? याचा शोध घ्यावा लागणार

दोन-चार इकडचे तिकडचे उलटबाजी करतात. मात्र मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद निर्माण होऊ द्यायचं नाही. गेल्या चार दिवसापासून मी या भूमिकेत होतो. तो वाद वाढला नाही हे खूप चांगलं झालं. हा वाद लावला जातोय की काय? अशी मला शंका आहे. पुतळा विकणारा कोण याचा शोध घ्यावा लागणार आहे. मला माहीतच नव्हतं हा कोण आहे? पुतळा कोण देतोय, कोण घेतोय? काय प्रकरण आहे आणि कोणीही येऊन फोटो काढणार आणि मी त्याच्यासोबत आहे हे सांगणार, असे गैरसमज पसरवले जात आहे. माझं नाव वापरून मला डाग लावण्याचा प्रयत्न करू नये, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. 

Continues below advertisement

Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका. आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय. मला हे षडयंत्र कळायला तयार नाही. हे पुतळे कोण देत आहे? कोणीतरी येऊन माझ्याबरोबर फोटो काढतो आणि मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण होतो, असे देखील त्यांनी म्हटले. 

Anjangaon Statue Controversy: नेमका काय होता वाद? 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून आणि तो तिथून हलवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून सुरू झाला होता. अंजणगाव येथे खिलोबा मंदिरासमोर रात्रीतून महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. प्रशासनाने हा पुतळा तिथून हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले होते. पुतळा ज्या जागेवर बसवण्यात आला आहे, त्या जागेवरून दोन गटांत मतभेद आहेत. त्यामुळे एक गट पुतळा त्याच जागी राहावा या भूमिकेवर ठाम होता. दुसरीकडे, दुसऱ्या गटाची भूमिका ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असून, तिथे पुतळा बसवण्यास काही मर्यादा किंवा हरकत असल्याचे म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर मोठा तणाव निर्माण झाला होता. आत निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झाले आहे. त्यामुळे आता या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधणार आहेत. 

आणखी वाचा 

Nashik Accident News: दिंडोरी दुर्घटनेनंतर नरहरी झिरवाळांना स्थानिकांचा घेराव; 'त्या' 9 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? सवाल विचारत वाचला तक्रारींचा पाढा