धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल, माझ्याकडे त्यांची 22 प्रकरणं; मनोज जरांगेंनी पुन्हा डिवचलं
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांची माझ्या जवळ 22 प्रकरण आली आहेत असे जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांची माझ्या जवळ 22 प्रकरण आली आहेत. त्यामुळं तू शहाणा हो, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल असेही जरांगे म्हणाले. फक्त मंत्रिपद द्यायचं म्हटलं होतं तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला होता. त्यामुळं मंत्रीपद दिलं तर पक्ष संपेल, भाजप कशाला हाताने हे गळ्यात गुंतून घेईल अशी टीका जरांगेंनी मुंडेंवर केली.
भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रीपद देईल?
रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रीपद देईल? असे सवाल करत जरांगेंनी मुंडेंवर टीका केली. संतोष भैया देशमुख यांना अजून न्याय नाही, त्यांचा खून करण्यात आला त्याच्याच कार्यकर्त्यांकडून आणि त्याला मंत्रिपद देणार का? असा सवाल जरांगे यांनी केला. राष्ट्रवादी तर देणार नाही कारण देण्या अगोदर त्यांचे एवढे हाल आहेत तर दिल्यावर तर पूर्ण पक्ष संपेल. रक्ताने हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचं नाही यामुळे माझा दिवस चांगला जात नाही. घातपाताच्या सुपारी देऊन त्याने पुन्हा आमचेच लोक स्टॅन्ड केले आहेत? आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत. काळजी करु नको अजूनही सांगतो धन्यानं आमच्या नादी लागू नये असा इशारा जरांगेंनी दिला.
तुझी लाभार्थी टोळी माझ्या विरोधात कशी लावली हे चांगलं माहीत
आमचे लोक घातपात करुन पुन्हा उचकवून देऊ नये त्याने, तुझी एवढी प्रकरणं आहेत माझ्याकडे तरी मी अजून त्यात हात घातलेला नाही. तुझी लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहित आहे, तू बदनाम करत आहे मला हे देखील मला चांगलं माहित आहे. तुझे एवढी प्रकरण माझ्याकडे आली आहेत, मी अजून त्यात हात घातलेला नाही असे जरांगे म्हणाले. रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूर वरुन माझ्याकडे आली होती आणि त्यांनी सांगितलेलं एवढं भयानक मॅटर आहे, त्यामुळे तू सावध रहा असे जरांगे पाटील म्हणाले. धन्या तू इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नको तुझे खूप प्रकरण माझ्याकडे आली आहेत असे जरांगे म्हणाले.
माझ्याजवळ 22 पेक्षा अधिक प्रकरणे आली आहेत
मी एकच बोललो आहे अजून तू यातून सावध हो रंजना प्रदीप नागपूरकर ही महिला आज सकाळी येऊन माझ्या घरी खूप रडत होती. तिचा नवरा देखील मेलेला आहे, याच्याच टेन्शनमुळे हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत नसेल. तुमच्याच पाहुण्यांना मला असं वाटतं फडणवीस साहेबांच्या आई आहेत शोभाताई फडणवीस, या महिला त्यांच्याच घरातल्या नातेवाईक आहेत असे जरांगे म्हणाले. मी फक्त त्याला संदेश दिला आहे की तुझे पण खूप प्रकरण माझ्याकडे आली आहेत. तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपार्या देत आहे, ते गप्प बसलेले होते तरी तुझ्याच टोळीने कसं उचकवलं त्यांना पुन्हा. माझे काहीच प्रकरण नाहीत, माझ्यावर केलेल्या प्रत्येक आरोपावर मी जर फौजदारी खटले दाखल केले तर माझ्या विरोधात बोलणाऱ्याला लाईफच भोगावे लागेल जेल मध्ये असे जरांगे म्हणाले. त्यामुळे तू शहाणा हो माझ्या नादी लागू नकोस, मी जर मागे लागलो तर तुझे माझ्याजवळ 22 पेक्षा अधिक प्रकरण आलेली आहेत

























