Manoj Jarange Patil: राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Maharashtra flood relief) ऊस उत्पादकांकडून सरसकट प्रतिटन 15 रुपये कट करून घेण्याचा निर्णयाला मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. एका एका पक्षाकडे (political leaders wealth) हजार हजार लोक असून एक एक कोटी दिल्यास दिवसात हजार कोटी होतील, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचा एकही रुपया कापण्यास विरोध केला. मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात श्रीमंत व्यक्ती, राजकारणी, उद्योगपती आणि सरकारी नोकरदारांकडून पैसे घेऊन ते शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की हे सर्व करणे शक्य आहे आणि त्यांनी ते करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. मुख्यमंत्र्यांना जमत नाही का शेतकऱ्यांना द्यायला? अशी विचारणा त्यांनी केली. 

Continues below advertisement

सरकारी नोकरदारांच्या पगारातून कपात करा (government employees salary cut) 

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारी नोकरदारांच्या पगाराचा चौथा हिस्सा कापून तो शेतकऱ्यांना देण्याची सूचना केली आहे. ते म्हणाले की, एखाद्याचा 20 हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा 5000, ज्याला एक लाख आहे त्याचे 25 हजार कापा, ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा, त्यांचा चौथा हिस्सा कापायचा. त्यांनी असा दावा केला की अनेक नोकरदारांकडे अनधिकृत संपत्ती असू शकते आणि ही कपात त्यांना फारशी बाधणार नाही. कमीत कमी चार पाच लाख अधिकारी असतील. नोकरीवाले 10 लाख. या 10 लाखातच जवळपास हजार एक कोटी रुपये जमा होतील, असे ते म्हणाले. 

राजकीय नेते आणि घराण्यांच्या संपत्तीतून घ्या (Manoj Jarange on political leaders wealth)

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा कापून तो शेतकऱ्यांना द्यावा. ते म्हणाले की, "आता देवेंद्र फडणवीसांची प्रॉपर्टी कमी आहे का? अजित पवारची कमी आहे का? शिंदे साहेबाकडे काय रोग आलाय का? त्यांचे कापा. उद्धव ठाकरेंकडे काही कमी पडलं का? शरद पवारांकडे पुरी काडीच लागली का? काँग्रेसचे नाना पटोले, सोनिया गांधी असतील यांच्याजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांचाही उल्लेख केला, त्या राज ठाकरेकडे काय कमी आहे का? नारायण राणेकडे काही कमी पडलं असल का? याशिवाय, त्यांनी विविध राजकीय घराण्यांचा उल्लेख केला. विखे पाटील, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येत. त्या छग्याला (छगन भुजबळ) दोन चार पोते भरून द्या पैशाचे, असा टोला त्यांनी लगावला. 

Continues below advertisement

उद्योगपती आणि व्यावसायिकांकडून मदत घ्या (Ambani Tata Bajaj donation) 

जरांगे पाटील यांनी देशातील मोठ्या उद्योगपतींकडून पैसे घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अंबानी, टाटा बजाजवाले आणखी काही आहेत त्यांच्याकडून घ्या. त्यांनी रिलायन्स पंपाच्या व्यवसायाचा उल्लेख करत म्हटले की, त्यांच्या एका दिवसाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना मदत करता येईल. निवडणुकीवेळी देणग्या देणाऱ्या उद्योगपती आणि व्यापाऱ्यांकडून पैसे घ्यावेत. बॉलिवूड अभिनेत्यांच्या प्रचंड संपत्तीवरही भाष्य केले आणि त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. 

इतर महत्वाच्या बातम्या