Manoj Jarange Patil :  मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्टसह एसआयटी चौकशी करावी अशी मागणी, जरांगेंच्या घातपाताचा आरोप असलेल्या अमोल खुणे यांनी केली आहे. ते मनोज जरांगे यांचे जुने सहकारी देखील होते. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले असून अमोल खुणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करा. दूध का दूध पानी का पानी होऊ द्या असे जरांगे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करा. दूध का दूध पानी का पानी होऊ द्या. परळीचं खरखट गप्प बसणार नाही, जामीन झालं की पुन्हा पुन्हा तो कट रचणार असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.  हे सगळं घडवून आणतो तो धन्याच आहे, असं म्हणत जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडेंवर टीका केली. तू धुतल्या तांदळाचा होता तर तू म्हणायला पाहिजे होतं की  धान्यसहीत नार्को टेस्ट करा असे मुंडे म्हणाले. खुणेच्या आईने आणि पत्नीने सांगितलं होतं की तो पितोय. हे पोरग असा आहे की स्वतः सुखाने खायचं नाही घरच्याला सुखाने तुकडे खाऊ द्यायचे नाही. याला कोणीतरी फुस लावेल म्हणून मी एसपींना सांगितले. तुला कोणी सांगितलं गेलंय का किंवा याने इसार घेतला होता का? असा सवाल जरांगे यांनी केला. 

आरोप सिद्ध करावे लागतील नाहीतर...

झालेले आरोप सिद्ध करावे लागतील नाहीतर पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत, आता सुट्टी नाही असे जरांगे पाटील म्हणाले. आंदोलनाचे जे आरोप करायचे आहे त्याचे तुला पुरावे द्यावे लागतील नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल होतील. तुझं पुढे बघ आता काय काय होतं तू फक्त नीट राहू नकोस इथून पुढे असे जरांगे म्हणाले. दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करण्यासाठी तू आपल्या जातीला डाग लावतो का? असा सवाल देखील जरांगे यांनी केला. 

दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या 

मनोज जरांगे यांनी त्यांचे सहकारी अमोल खुणे यांनी केलेल्या आरोपावर प्रतिउत्तर देत आंदोलनाबाबत खुणे यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावी लागतील नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल होतील असे म्हंटलय, आज त्यांनी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत अमोल खुणे यांनी केलेल्या अर्जाची अंमलबजावणी करा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या असं म्हणत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. अमोल खुनीच्या आईने आणि पत्नीने तो दारु पीत असल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे याला कोणीतरी फुस लावेल म्हणून मी पोलीस अधीक्षकांना भेटल्याचे देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान आपल्या घातपाताचा कट रचलेल्या आरोपींचा जामीन रद्द करून त्यांची नार्कोटेस्ट करावी असे देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.