Manoj Jarange Patil : जोपर्यंत काँग्रेसचा सुफडा साफ होत नाही तोपर्यंत विजय वडेट्टीवार गप्प बसत नाही वाटतं. कारण तो छगन भुजबळ यांच्या विचारांच्या आहिरी गेला आहे. जो नेता छगन भुजबळच्या आहारी गेला तो नेता संपल्याशिवाय राहत नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत प्रसारमाध्यमांंशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वरट्टीवार सुद्धा गुंतला
छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वरट्टीवार सुद्धा गुंतला आहे. चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्ष नेता होता, चांगलं काम करत होता. परंतू आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाला आहे. काँग्रेसचा महामोर्चा, काँग्रेसचा मोर्चा होता दीड छटाक होते का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
वडेट्टीवारांना दुखणं आणि द्वेष फक्त मराठा समाजाचा
मराठा समाजाला 48 टक्के आरक्षण आहे असं वडेट्टीवार म्हणाले होते, यावर देखील जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते आता प्युअर येडं झालं आहे. त्याला हे दिसत नाही कितीतरी जाती ओबीसी मध्ये आल्या त्यांच्या जागा कमी झाल्या. ज्या जाती ओबीसीमध्ये बसत नाहीत त्या त्यांना चालतात असे जरांगे पाटीलम्हणाले. जो समाज मागासवर्गीय आयोगाची निकष पूर्ण करत नाही तो समाज सुद्धा त्यांना ओबीसी मध्ये चालतो. त्यांना दुखणं आणि द्वेष फक्त मराठा समाजाचा आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. फक्त मराठ्यांना काही नाही मिळालं पाहिजे. तुला ओबीसीचा एवढा पुळका येतो, एवढी माया येते इथून मागे मोर्चा काढायचा ना मग अशी टीकाही जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली. त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी राग आणि द्वेष आहे.
हे छगन भुजबळच्या आहारी गेलेले लोक आहेत
मनोज जरांगे लेकर लेकर म्हणत आहेत मग आमची काय बकर आहेत का? असे वडेट्टीवार म्हणाले होते. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बकर शब्द हा छगन भुजबळचा आहे. हे छगन भुजबळच्या आहारी गेलेले लोक आहेत. परळीची एक लाभार्थी टोळी आहे असेही मनवोज जरांगे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: